Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण रुग्णालयात दाखल!
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणला (Deepika Padukone) सेटवर प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दीपिका सध्या हैदराबादमध्ये तिच्या आगामी सिनेमाचे शूटिंग करत आहेत. या सिनेमात दीपिका दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभाससोबत दिसणार आहेत.(photo:deepikapadukone/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहैदराबादच्या रामोजी फिल्मसिटीमध्ये या सिनेमाचे शूटिंग सुरू आहे. सेटवरच दीपिकाची प्रकृती बिघडल्याने तिला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण आता तिची प्रकृती सुधारल्याचे म्हटले जात आहे. (photo:deepikapadukone/ig)
दीपिका सध्या 'प्रोजेक्ट के' या सिनेमाचे शूटिंग करत आहे. अचानक तिच्या हृदयाचे ठोके वाढल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण आता तिची प्रकृती सुधारली असून ती सेटवर परतली आहे. तिने शूटिंगलादेखील सुरुवात केली आहे. 12 जूनला तिला अस्वस्थ वाटत असल्याने ती हैदराबादमधील एका रुग्णालयात गेली होती. (photo:deepikapadukone/ig)
दीपिकाचा 'पठाण' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात दीपिकासोबत शाहरुख खानदेखील दिसणार आहे.(photo:deepikapadukone/ig)
दीपिकाने शाहरुखसोबत तिच्या सिनेसृष्टीतील करिअरला सुरुवात केली होती. आता पुन्हा एकदा 'पठाण'च्या माध्यमातून दोघे स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. (photo:deepikapadukone/ig)
'पठाण' नंतर दीपिकाचा 'फायटर' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात दीपिका ऋतिक रोशन सोबत दिसणार आहे. तसेच दीपिका प्रभाससोबत 'प्रोजेक्ट के'मध्येदेखील दिसणार आहे. (photo:deepikapadukone/ig)