Photo : कॉलेजपासून मॉडेलिंगची सुरुवात, म्युझिक व्हिडीओ ते चित्रपट ‘असा’ होता चित्रांगदाचा फिल्मी प्रवास!
बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंह आज (30 ऑगस्ट) तिचा 46वा वाढदिवस साजरा करत आहे. चित्रांगदा सिंहचा जन्म जोधपूर, राजस्थान येथे झाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचित्रांगदा सिंहचे वडील आर्मी ऑफिसर होते. तर, तिचा भाऊ दिग्विजय सिंह प्रसिद्ध गोल्फपटू आहे. चित्रांगदाने दिल्लीच्या लेडी श्री राम कॉलेजमधून आपले पदवी शिक्षण पूर्ण केले आहे.
चित्रांगदाने कॉलेजच्या दिवसांपासून मॉडेलिंगला सुरुवात केली होती. कॉलेजमध्ये घडलेल्या एका घटनेमुळे तिचे संपूर्ण आयुष्य पालटले होते.
अल्ताफ राजा यांच्या 'तुम तो ठहरे परदेसी' या अल्बममधून अभिनेत्री चित्रांगदाला मनोरंजन विश्वात लोकप्रियता मिळाली होती. तर, 'हजारों ख्वाहिशें ऐसी' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
प्रदीर्घ फिल्मी कारकीर्द असूनही चित्रांगदाला अभिनयात अपेक्षित प्रसिद्धी मिळवता आली नाही. त्यानंतर तिने चित्रपट निर्मितीत हात आजमावला.
'देसी बॉईज', 'इनकार' आणि 'ये साली जिंदगी' यांसारख्या अनेक चित्रपटांमधून तिने आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे.
चित्रांगदाने (Chitrangda Singh) 2001 मध्ये भारतीय गोल्फपटू ज्योती रंधवासोबत लग्नगाठ बांधली होती. त्यांना जोरावर नावाचा एक मुलगाही आहे.
पण, चित्रांगदा आणि ज्योती यांचे हे नाते फार काळ टिकले नाही आणि 2014 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. (Photo : @chitrangda/IG)