In Pics | क्रिकेटपट्टू Harbhajan singh सोबत आपलं नातं का लपवत होती Geeta Basra?

Feature_Photo_

1/6
अभिनेत्री आणि क्रिकेटपट्टू हरभजन सिंहची पत्नी गीता बसरा आता दुसऱ्यांदा आई होणार आहे. गीताने तिच्या इन्स्टाग्रामवरून ही माहिती दिली आहे. हा क्षण माझ्यासाठी अत्यंत खास असा आहे अशी भावना गीताने व्यक्त केली आहे. त्यातसोबत हरभजन सिंह सोबत असणारे तिचे नाते का लपवले याचाही खुलासा तिने केला आहे.
2/6
टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत गीताने सांगितलं की, ती वेळच अशी वेगळी होती. कुणासोबत रिलेशनशिपमध्ये असणं ही गोष्टच मोठी होती. मला आठवतंय की त्यावेळी एका मोठ्या अभिनेत्रीने लग्न केलं होतं आणि तिला चित्रपट सोडावा लागला होता.
3/6
गीताने सांगितले की, चित्रपटाचे निर्माते असा विचार करायचे की अभिनेत्रीने लग्न केल्यास नंतर तिच्या प्रेग्नंन्सीमुळे चित्रपट थांबवावा लागेल. मला माझ्या पहिल्या चित्रपटानंतर अनेक ऑफर्स मिळाल्या.
4/6
गीता ने सांगितलं की, मला एका स्टारकिडने चित्रपटात रिप्लेस केलं होतं. मला नंतरही अनेक जणांनी रिप्लेस केलं. त्या चार चित्रपटांपैकी दोन चित्रपट हिट झाले. मला आणि हरभजनला एका कॉफी शॉपच्या बाहेर स्पॉट करण्यात आलं होतं. त्यावेळी आम्ही रिलेशनशिपमध्ये नाही हे मी सिद्ध करू शकले नाही.
5/6
पहिल्या चित्रपटानंतर माझ्यात आणि हरभजन सिंह मध्ये 10 महिने मैत्री होती. नंतर ही मैत्री रिलेशनशिपमध्ये बदलली.
6/6
गीताने सांगितलं की मला माझ्या परिवाराशी असलेल्या जिव्हाळ्यामुळे रिलेशनशिपमध्ये असावे असं वाटत नव्हतं. एका क्रिकेटपट्टूशी रिलेशनमध्ये अडकण्याची भीतीही वाटत होती, कारण खेळाडूंनी अनेक गर्लफ्रेण्ड्स असतात अशी चर्चा होती.
Sponsored Links by Taboola