Varun Dhawan Wedding | अलिबागमध्ये 'या' आलिशान रिसॉर्टवर पार पडणार वरुण- नताशाचा विवाहसोहळा
1/6
अभिनेता वरुण धवन आणि त्याची बालमैत्रीण नताशा दलाल अखेर विवाहबंधनात अडकण्यासाठी सज्ज झाले आहेत. मुंबईपासून 100 किमी म्हणजेच हाकेच्या अंतरावर असणाऱ्या अलिबागमधील सासवणे येथे असणाऱ्या एका आलिशान रिसॉर्टवर हा विवाहसोहळा पार पडणार आहे.
2/6
लग्नसोहळ्यासाठी मोजक्याच पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. ज्यानंतर मुंबईत वरुणच्या लग्नसोहळ्याच्या निमित्तानं दिमाखदार रिसेप्शन सोहळ्याचं आयोजन करण्यात येणार आहे.
3/6
23 जानेवारीपासून त्यांच्या लग्नविधींना सुरुवात होणार आहे. 24 जानेवारीला हिंदू रितीरिवाजांनुसार हा सेलिब्रिटी लग्नसोहळा पार पडणार आहे. (छाया सौजन्य- themansionhousealibaug.com)
4/6
सध्या निर्धारित ठिकाणी वरुणच्या लग्नासाठीची तयारी वेगानं सुरु असून, नताशा आणि खुद्द वरुण 22 जानेवारीला या ठिकाणी पोहोचणार आहेत. (छाया सौजन्य- themansionhousealibaug.com)
5/6
सेलिब्रिटी म्हटलं की, त्यांच्या डेस्टिनेशन वेडिंगची बरीच चर्चा असते. सहसा बी- टाऊन सेलिब्रिटी परदेशी जाऊन लग्न करण्याला प्राधान्य देतात. पण, वरुणनं मात्र अलिबागला प्राधान्य दिलं आहे.
6/6
'The Mansion House' असं या रिसॉर्टचं नाव असून, एक एकराच्या जागेत ही आलिशान वास्तू उभी आहे. जिथं फक्त 25 खोल्यांचीच क्षमता आहे. असं असलं तरीही या रिसॉर्टमध्ये स्विमिंग पूल, एक मोठा हॉल, गार्डन एरिया आणि इतरही अत्याधुनिक सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.
Published at :