33 वर्ष इंडस्ट्री गाजवली, 90 पेक्षा जास्त ब्लॉकबस्टर दिले; झिरोतून 'हिरो' अन् पुढे बनला सुपरस्टार, दुबईतल्या रस्त्याला दिलंय 'याचं' नाव

Bollywood Actor Struggle Life: बॉलिवूड गाजवणाऱ्या या अभिनेत्यानं चित्रपटांमध्ये कारकिर्द सुरू केल्यापासून त्यानं कोणताही हॉलिवूड चित्रपट केलेला नाही किंवा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम केलेलं नाही.

Bollywood Actor Struggle Life

1/12
पण, तरीसुद्धा हा स्टार आज बॉलिवूडवर राज्य करतोय. याचे चित्रपट बॉलिवूड जेवढं गाजवतात. तेवढेच परदेशातही चालतात. दुबईत तर याच्या नाव एका रस्त्याला देण्यात आलंय.
2/12
आम्ही ज्याच्याबाबत बोलतोय त्याचं नाव, बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आहे.
3/12
बॉलिवूडचा 'बादशाह' शाहरुख खाननं आजवर अनेक क्लासी चित्रपट केलेत. काही गाजलेत, काही आपटलेत... पण त्यासोबतच शाहरुखनं चाहत्यांच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण केलंय.
4/12
25 जून 1992 रोजी 'दीवाना' चित्रपटातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या शाहरुख खाननं इंडस्ट्रीमध्ये 33 वर्ष पूर्ण केली.
5/12
या 33 वर्षांत शाहरुख खाननं सुमारे 97 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. यापैकी 90 चित्रपट प्रदर्शित झाले आहेत आणि 7 चित्रपट आगामी काळात रिलीज होणार आहेत.
6/12
1992 मध्ये 'दीवाना' चित्रपटातून पदार्पण केल्यानंतर, शाहरुख खाननं 'बाजीगर' आणि 'डर' सारख्या चित्रपटांमध्ये निगेटिव्ह भूमिका साकारून आपलं अभिनय कौशल्य सिद्ध केलं.
7/12
1995 हे वर्ष शाहरुखच्या कारकिर्दीतील महत्त्वाचं वर्ष होतं. यावर्षी त्यानं 'करण अर्जुन', 'जमाना दीवाना', 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे'सह सात चित्रपट केले, ज्यांची एकूण कमाई 638.92 कोटी रुपये होती.
8/12
'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' (DDLJ) नं शाहरुखला 'रोमँटिक हिरो'ची ओळख मिळवून दिली. यानंतर 'कुछ कुछ होता है', 'कल हो ना हो', 'मोहब्बतें', 'मैं हूं ना' यांसारख्या हिट चित्रपटांनी त्यांनं सर्वांच्याच मनाचा ठाव घेतला .
9/12
प्रत्येक यशस्वी अभिनेत्याप्रमाणे, शाहरुख खानच्या करिअरमध्येही उतार-चढाव आले. शाहरुखचे काही चित्रपट सुपरडुपर फ्लॉपही ठरलेत.
10/12
'जब हैरी मेट सेजल' (2017), 'फैन' (2016), 'जीरो' (2018), 'बिल्लू' (2009), और 'पहेली' (2005) हे शाहरुखचे चित्रपट फ्लॉप झालेत.
11/12
अपयशानंतर शाहरुख खाननं शानदार वापसी केली. 2023 मध्ये त्यानं 'पठान' आणि 'जवान' सारख्या ब्लॉकबस्टर फिल्म्सही एकत्र केल्या.
12/12
2022 मध्ये दुबईच्या अधिकाऱ्यांनी एका रस्त्याचं नाव 'शाहरुख खान बुलेवार्ड' ठेवलं होतं.
Sponsored Links by Taboola