Satish Kaushik : सतीश कौशिक यांनी आपल्या मागे सोडली कोट्यवधींची संपत्ती; जाणून घ्या कमाईबद्दल...
Satish Kaushik : मीडिया रिपोर्टनुसार, सतीश कौशिक यांनी आपल्या मागे 120 कोटींची संपत्ती सोडली आहे.
Satish Kaushik
1/10
प्रेक्षकांना खळखळून हसवणारे अभिनेते सतीश कौशिक यांनी वयाच्या 66 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
2/10
सतीश कौशिक यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.
3/10
अनिल कपूरच्या 'मिस्टर इंडिया' या सिनेमातील 'कॅलेंडर' या भूमिकेमुळे सतीश कौशिक घराघरांत पोहोचले.
4/10
अभिनेता, पटकथा लेखक आणि निर्माता म्हणून हिंदी सिनेसृष्टीत काम करण्यासोबत सतीश कौशिक यांनी अनेक मालिकांमध्ये देखील काम केलं.
5/10
सतीश कौशिक यांनी 35 वर्षांहून अधिक वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.
6/10
सतीश कौशिक यांनी 100 पेक्षा अधिक सिनेमांत आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.
7/10
प्रेक्षकांना खळखळून हसवणारे सतीश कौशिक यांचे मुंबईत एक आलिशान घर आहे.
8/10
सतीश कौशिक यांच्याकडे 'ऑडी Q7', 'ऑडी Q 3' या महागड्या गाड्यादेखील आहेत.
9/10
मीडिया रिपोर्टनुसार, सतीश कौशिक यांनी आपल्या मागे 120 कोटींची संपत्ती सोडली आहे.
10/10
अभिनय, लेखन, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून सतीश कौशिक यांनी चांगलीच कमाई केली आहे.
Published at : 10 Mar 2023 12:14 PM (IST)