Amrita Singh शी घटस्फोट घेतल्यानंतर Saif Ali Khan म्हणाला होता 'जगातील सर्वात वाईट गोष्ट म्हणजे...'
sf
1/6
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंह यांच्या नात्याही बरीच चर्चा आजही कलाविश्वात रंगते.
2/6
सैफनं अवघ्या 20व्या वर्षी अमृता सिंह हिच्याशी लग्नगाठ बांधली होती. त्यावेळी अमृता 32 वर्षांची होती. सैफहून ती वयानं 12 वर्षे मोठी होती.
3/6
या दोघांनीही त्यांच्या लग्नाची माहिती गुलदस्त्यातच ठेवली होती. घरातील मंडळी नातं स्वीकारणार नाहीत, अशीच धास्ती त्यांना लागली होती.
4/6
लग्नानंतर काही वर्षांनीच सैफ आणि अमृताच्या कुटुंबात त्यांच्या मुलीच्या रुपानं भर पडली. ज्यानंतर इब्राहिम या मुलाचाही जन्म झाला.
5/6
2004 मध्ये सैफ आणि अमृताचं 14 वर्षांचं वैवाहिक नातं संपुष्टात आलं. घटस्फोटानंतर दोन्ही मुलांची कस्टडी अमृताकडे राहिली.
6/6
एका मुलाखतीत अमृताशी घटस्फोट घेण्याबाबत सैफनं त्याचं दु:ख व्यक्त केलं होतं. माझ्यासाठी ही जगातील सर्वात वाईट गोष्ट होती. ही एक अशी गोष्ट आहे जी कधीच सुधारली जाऊच शकत नाही, असाच विचार मी करत होतो, असं सैफ म्हणाला होता.
Published at : 12 Mar 2021 08:01 PM (IST)