Rajiv Kapoor | एका अभिनेत्रीमुळं नात्यात मीठाचा खडा; वडिलांपासून राजीव कपूर यांचा दुरावा
2020 मध्ये ज्याप्रमाणं कपूर कुटुंबाला ऋषी कपूर यांच्या निधनानं धक्का बसला, त्याचप्रमाणं 2021 या वर्षाच्या सुरुवातीला कुटुंबातील आणखी एका व्यक्तीनं जगाचा निरोप घेतला. ही व्यक्ती म्हणजे, अभिनेते राजीव कपूर.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहा दुरावा इतकी वर्षे चालला की, राज कपूर यांच्या निधनानंतरही राजीव यांनी त्यांच्या अंत्यसंस्कारांना उपस्थिती लावली नव्हती. कुटुंबापासूनच दूर राहत काही दिवस त्यांनी मद्याच्या नशेचा आधार घेत दु:खाच्या या दिवसांना तोंड दिलं होतं असंही सांगितलं जातं.
आपल्या वाट्याला आलेलं हे अपयश राज कपूर यांच्यामुळं असल्याचीही भावना राजीव यांच्या मनात घर करुन गेली. 'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटानंतरही राज कपूर यांनी आपल्यासाठी आणखी एक चित्रपट साकारावा अशी त्यांची अपेक्षा होती. त्या चित्रपटाच्या माध्यमातून राजीव यांना आपली वेगळी छाप सोडायची होती. पण, तसं काही झालं नाही.
कारकिर्दीत आलेल्या अपयशाचे थेट पडसाद हे नात्यांवर झाले. अपयशाला कारणं अनेक ठरली पण, त्यामुळं वडील आणि मुलाचं नातं मात्र कायमचं दुरावलं.
राज कपूर यांनी सदर चित्रपटातून मुलाला एक संधी देऊ केली. चित्रपट कमालीचा गाजला, चर्चेतही आला. पण, निमित्त ठरलं ते म्हणजे अभिनेत्री मंदाकिनीचा धबधब्याखाली अंघोळ करणारं दृश्य आणि तिचं मादक सौंदर्य. या चित्रपटानं मंदाकिनी हे नाव रातोरात प्रसिद्धीझोतात आलं. पण, राजीव मात्र कुठेच दिसले नाहीत. त्यांच्या नावाला आणि कारकिर्दीला मात्र अपेक्षित वेग मिळाला नाही, ही बाब वडील राज कपूर यांच्या मनातच राहिली.
मुलाच्या यशासाठी राज कपूर यांनी पुढं पावलं उचलली नाही, उलटपक्षी त्यांना असिस्टंट म्हणून आपल्या हाताशी कामाला ठेवलं. राम तेरी... नंतरही राजीव कपूर यांचे काही चित्रपट आले. पण, तेही प्रेक्षकांच्या मनावर अपेक्षित छाप पाडू शकले नाहीत.
'एक जान है हम' या चित्रपटातून त्यांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं असलं तरीही, हा चेहरा प्रकाशझोतात आला तो म्हणजे 'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटामुळं. राजीव यांना चित्रपटानं ओळख दिली खरी, पण यशाची हीच पायरी वडील- मुलाच्या नात्यात मात्र दुरावा आणून गेली. मधू जैन यांच्या 'द कपूर्स' या पुस्तकात या नात्याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
राज कपूर यांचासर्वात धाकटा मुलगा अशी राजीव कपूर यांची ओळख. सेलिब्रिटी कुटुंबाचा वरदहस्त असतानाही राजीव कलाविश्वात फारशी यशस्वी कारकिर्द साकारू शकले नाहीत. किंबहुना वडील राज कपूर यांच्याशी त्यांचं नातं फारसं चांगलं नव्हतं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -