Amitabh Bachchan House | ...असं आहे बिग बी अमिताभ बच्चन यांचं राहतं घर
हा आहे त्यांच्या घरातील राम दरबार. इथं कायमच फुलांची सुरेख अशी सजावट करण्यात येते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतील जुहू भागात अमिताभ बच्चन आणि त्यांचं कुटुंब वास्तव्यास आहे.
बिग बींना जुन्या आठवणी साठवण्याचा छंद आहे. घराच्या भींतींवर फोटोंच्या रुपात याचीच झलक पाहायला मिळते.
संपूर्ण घरामध्ये मोठ्या चित्रकारांनी साकारलेल्या पेंटींग्ज आहेत.
घराचं छतही अशा कलात्मकरित्या साकारण्यात आलं आहे, जिथून साऱ्या शहराला पाहता येतं.
बिग बींच्या घरामध्ये अनेक गोष्टींची विशेष काळजी घेण्यात आली आहे. इथं घराबाहेर थेट बागेला सुरुवात होत नसून एमबॅकमेंट आहे. जिथे अनेकदा बच्चन कुटुंबीय दिवाळीचा आनंद घेताना दिसतात.
घरात असणारी बैठकव्यवस्थाही तितकीच आकर्षक आहे.
इथं असणाऱ्या मूर्त्यांना रत्नजडीत सजावट करण्यात आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार संपूर्ण बच्चन कुटुंब याच ठिकाणी राहतं. बिग बींच्या घरात देवाची मनोभावे पूजा केली जाते. यासाठी घरात एक खास मंदिरही आहे.
बिग बींचं हे निवासस्थान म्हणजे जणू एक महालच. इथं असणाऱ्या इंटेरियरपासून ते अगदी प्रत्येक लहामनोठ्या गोष्टीपर्यंत सारंकाही अगदी खास आहे.
अमिताभ बच्चन यांची भेट घेण्यासाठी किंवा त्यांची एक झलक पाहण्यासाठी अनेकांचीच पावलं त्यांच्या निवासस्थानाकडे वळतात.
जितकं कुतूहल चाहत्यांना बिग बींच्या आगामी चित्रपटांबद्दल असतं, तितकंच कुतूहल त्यांच्या 'जलसा' या निवासस्थानाबाबतही आहे. कारण, इथेच असंख्य चाहत्यांना अमिताभ बच्चन यांची एक झलक पाहायला मिळते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -