IN PICS | मलायकाशी लग्नाबाबतच्या प्रश्नावर अर्जुनच्या उत्तरानं जिंकली सर्वांची मनं

malaikaarj

1/5
अभिनेत्री, मॉडेल मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर हे जवळपास मागील तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. आतापर्यंत या सेलिब्रिटी जोडीला अनेकदा लग्नाबाबतचे प्रश्न विचारण्यात आले आहेत. अशाच एका प्रश्नावर अर्जुननं दिलेलं उत्तर सर्वांचीच मनं जिंकून गेलं होतं.
2/5
मी एका विभक्त कुटुंबातून आलेलो असलो तरीही विवाहसंस्थेवर माझा विश्वास आहे. आजुबाजूला मी कित्येक आनंदी जोडपी पाहतो. पण, याचा अर्थ असा होत नाही की मीसुद्धा लग्न करण्यासाठी या मैदानात उडी घेईन. जीवनात अनेक वळणं येतात. रिलेशनशिपमध्ये येणाऱ्या चढ- उतारांचा आनंद घेत ते तुम्हाला कुठवर नेतात हे पाहणं मह्त्वाचं आहे, असं अर्जुन म्हणाला होता.
3/5
लग्नाच्या निर्णयाबाबत असणाऱ्या दबावाविषयी सांगता तुम्ही एखाद्या निर्णयासाठी तयार असता त्यावेळी इतरांचं मत नगण्य असतं. त्यामुळं मी काय करावं हे मला कुणी सांगणं गरजेचं नाही, लग्नाची भावनाच मनातून आली पाहिजे असं स्पष्ट मत त्यानं मांडलं होतं.
4/5
जवळची मंडळी जे विचार करतात ते तुम्हाला सांगतात पण, अखेर निर्णय़ तुमचाच असतो. माझे मित्र आणि कुटुंब कायम माझ्यासोबत राहिलं आहे. त्यांनी कायम मला मदत केली आहे. पण, सर्वजण जे करत आहेत तेच तूसुद्धा कर हे मात्र मला कोणीही सांगू शकत, नाही असं अर्जुननं सांगितलं होतं.
5/5
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे सध्या बी- टाऊनमधील मोस्ट हॅपनिंग कपल्सपैकी एक आहे. त्यामुळं या जोडीवर छायाचित्रकारांपासून ते अगदी चाहत्यांपर्यंत सर्वांच्याच नजरा असतात. (सर्व छायाचित्र- सोशल मीडिया)
Sponsored Links by Taboola