In Pics : जब मिल बैठेंगे सब यार; LAC वर जाऊन खिलाडी कुमारनं घेतली जवानांची भेट
अभिनेता अक्षय कुमार, अर्थात बी- टाऊनच्या खिलाडी कुमारनं नुकतंच काही खास व्यक्तींसोबत वेळ व्यतीत केला. या व्यक्ती म्हणजे सीमैवर तैनात असणारे जवान. (छायाचित्र सौजन्य- instagram bsf_india, instagram_akshaykumar)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअक्षयनं जम्मू काश्मीरमधील बंदीपोरा जिल्ह्यात असणाऱ्या गुरेझ खोऱ्यातील एलएसीनजीक असणाऱ्या तुलैल येथे त्यानं ही भेट दिली. (छायाचित्र सौजन्य- instagram bsf_india, instagram_akshaykumar)
सुत्रांच्या माहितीनुसार अभिनेत्यानं, तुलैलमधील नीरु हे गाव सर्वप्रथम गाठलं. ज्यानंतर त्यानं बीएसएफ जवानांशी संवाद साधला. (छायाचित्र सौजन्य- instagram bsf_india, instagram_akshaykumar)
सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यानं या भेटीतील खास क्षण चाहत्यांच्या भेटीला आणले. (छायाचित्र सौजन्य- instagram bsf_india, instagram_akshaykumar)
यावेळी त्यानं जवानांशी काही खास खेळही खेळले. व्हॉलिबॉल खेळण्यापासून गप्पांचा फड रंगवण्यापर्यंतची एकच धमाल यापेळी पाहायला मिळाली. (छायाचित्र सौजन्य- instagram bsf_india, instagram_akshaykumar)
देशसंरक्षणार्थ बिकट परिस्थितीत शत्रूवर करडी नजर ठेवत आणि निसर्गाचा मारा झेलत कर्तव्य बजावणाऱ्या जवानांप्रती जणू अक्षयनं कृतज्ञताच व्यक्त केली होती. (छायाचित्र सौजन्य- instagram bsf_india, instagram_akshaykumar)
(छायाचित्र सौजन्य- instagram bsf_india, instagram_akshaykumar)