आमीर खाननं चाहत्यांना दिली खुशखबर! महाभारतावर करणार मोठा चित्रपट; नेमकं काय म्हणाला?
आमीर खानने त्याच्या चाहत्यांना एक खुशखबर दिली आहे. त्याने त्याच्या भविष्यातील एका महत्त्वाच्या चित्रपटाबद्दल सांगितलं आहे.
Continues below advertisement
aamir khan
Continues below advertisement
1/6
आमीर खान या कसलेल्या अभिनेत्याचे बॉलिवुडमध्ये वेगळे स्थान आहे. दोन किंवा तीन वर्षांत तो एकच चित्रपट काढतो, पण त्या चित्रपटांची सगळीकडे चर्चा असते.
2/6
त्याने नुकतेच एबीपी नेटवर्कच्या 'आयडियाज ऑफ इंडिया' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्याने वेगवेगळ्या विषयांवर दिलखुलासपणे गप्पा मारल्या. विशेष म्हणजे त्याने आगामी काळातल्या त्याच्या प्रोजेक्ट्सबाबतही सांगितलं.
3/6
सिनेक्षेत्रात तुम्हाला आगामी काळात नेमंक काय करायचं आहे? असं विचारण्यात आलं होतं. यावर उत्तर देताना त्याना मला आगामी काळात महाभारतावर एक चित्रपट काढायचा आहे, असं सांगितलं.
4/6
म्हणजेच आमीर खान लवकरच महाभारतावर मोठा चित्रपट घेऊन येणार आहे. ही घोषणा केल्यानंतर तू या चित्रपटात दिसशील का? असं विचारण्यात आलं. यावर उत्तर देताना कदाचित हो, असं म्हणत त्याने तो या चित्रपटात असण्याचे संकेत दिले आहेत.
5/6
दरम्यान, हा चित्रपट नेमका कधी येणार? तसेच या चित्रपटाचे नाव काय असणार हे अद्याप अस्पष्ट आहे. मात्र आमीर खान थेट महाभारतावर चित्रपट काढणार असल्यामुळे सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
Continues below advertisement
6/6
आमीर खानला मनोरंजन विश्वात लहान मुलांसाठीही काहीतरी करायचे आहे. लहान मुलांसाठी मनोरंजन क्षेत्रात म्हणावे तेवढे काम झालेले नाही, असे मत आमीर खानने मांडले आहे. त्यामुळे आगामी काळात तो लहान मुलांसाठी नेमकं काय नवं घेऊन येणार, याकडेही सर्वांचेच लक्ष लागले आहे.
Published at : 23 Feb 2025 07:23 PM (IST)