Abhishek Pathak Shivaleeka Oberoi Wedding : शुभमंगल सावधान! अभिषेक पाठक शिवालिका ओबेरॉयसोबत अडकला लग्नबंधनात; पाहा फोटो
अभिषेक पाठक नुकताच शिवालिका ओबेरॉयसोबत लग्नबंधनात अडकला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिषेक आणि शिवालिकाचा 9 फेब्रुवारीला गोव्यात शाही विवाहसोहळा पार पडला.
अभिषेक पाठक आणि शिवालिका ओबेरॉयच्या लग्नसोहळ्यात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
नवविवाहित जोडप्याने अर्थात शिवालिका ओबेरॉय आणि अभिषेक पाठकने सोशल मीडियावर लग्नसोहळ्यातील एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
अभिषेक पाठक आणि शिवालिकाचे लग्नसोहळ्यातील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
'खुदा हाफिज' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अभिषेक आणि शिवालिकाची मैत्री झाली होती.
अभिषेक पाठक आणि शिवालिकाच्या फोटोवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
अभिषेक पाठक आणि शिवालिकाची लव्ह स्टोरी खूपच फिल्मी आहे.
अभिषेक पाठक आणि शिवालिकाचं ग्रॅंड वेडिंग चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे.
कुटुंबीय आणि जवळच्या मित्र-मंडळींच्या उपस्थितीत अभिषेक पाठक आणि शिवालिकाचा शाही विवाहसोहळा पार पडला आहे.