बॉलिवूडपासून दूर गेलेला इमरान खान, पण त्याच्या सावत्र वडील कोण माहितीय? ओळख ऐकून व्हाल थक्क

इमरान खानचा जन्म 1983 मध्ये अमेरिकेत झाला. त्याने न्यूयॉर्क फिल्म अकॅडमीतून शिक्षण घेतलं आहे. त्याचे वडील अनिल पाल हे सॉफ्टवेअर इंजिनियर, तर आई नुजहत खान या मानसशास्त्रज्ञ आहेत.

Continues below advertisement

Imran Khan

Continues below advertisement
1/8
बॉलिवूडमधील नातेसंबंध जितके रंजक असतात, तितकेच ते अनेकदा आश्चर्यचकित करणारेही असतात. आमिर खानचा भाचा अभिनेता इमरान खान याच्या खासगी आयुष्याशी जोडलेली एक अशी गोष्ट आहे, जी फारच कमी लोकांना माहिती आहे.इमरान खानचे सावत्र वडील कोण आहेत, हे नाव ऐकून तुम्हालाही नक्कीच धक्का बसेल.
2/8
‘जाने तू… या जाने ना’ या सुपरहिट चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा इमरान खान ‘चॉकलेट बॉय’ म्हणून लोकप्रिय झाला होता. त्याच्या क्युट लुक्स आणि नैसर्गिक अभिनयाने तरुणाईचं मन जिंकलं. मात्र, यानंतर आलेल्या सलग अपयशी चित्रपटांमुळे त्याचा करिअरचा ग्राफ घसरला आणि तो हळूहळू चित्रपटसृष्टीपासून दूर गेला.
3/8
आता मात्र इमरान खान 2026 मध्ये ‘हॅप्पी पटेल: खतरनाक जासूस’ या चित्रपटातून कमबॅक करण्याच्या तयारीत असून, त्यामुळे त्याचे चाहते पुन्हा एकदा उत्साहित झाले आहेत.
4/8
इमरान अवघा दीड वर्षांचा असतानाच त्याच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. त्यानंतर नुजहत खान मुंबईत राहायला आल्या. पुढे त्यांनी अभिनेता राज जुत्शी यांच्याशी लग्न केलं.
5/8
अनेकांना माहीत नसेल, पण राज जुत्शी यांचं पूर्ण नाव राजेंद्रनाथ जुत्शी असं आहे. त्यांचा जन्म श्रीनगरमध्ये एका कश्मीरी हिंदू कुटुंबात झाला. त्यांचे आजोबा दीनानाथ जुत्शी हे देखील अभिनेते होते. नुजहत आणि राज जवळपास 16 वर्षे एकत्र राहिले, मात्र 2007 साली दोघांचा वेगळे होण्याचा निर्णय झाला.
Continues below advertisement
6/8
नुजहत आणि राज यांना स्वतःची संतती नव्हती, मात्र राज जुत्शी यांचे सावत्र मुलगा इमरान खानशी अतिशय जिव्हाळ्याचे नाते होते.
7/8
जेव्हा इमरानने आपल्या मामाच्या म्हणजेच आमिर खानच्या प्रोडक्शनमधील ‘जाने तू… या जाने ना’ या चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली, तेव्हा राज जुत्शी यांना प्रचंड आनंद झाला होता.
8/8
खूप कमी लोकांना माहिती आहे की राज जुत्शी आणि आमिर खान यांनी जवळपास 40 वर्षांपूर्वी ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटापासून बॉलिवूडमध्ये एकत्र कामाची सुरुवात केली होती. त्यानंतर ‘माचिस’, ‘लगान’, ‘स्लमडॉग मिलियनेयर’, ‘लक्ष्य’, ‘तारे जमीन पर’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्येही राज जुत्शी यांनी आमिर खानसोबत काम केलं आहे.
Sponsored Links by Taboola