In Pics : Aamir Khan म्हणायचा, 'Kiran Rao विना जीवन अधुरे, तिच्याशिवाय जगण्याची कल्पनाही करु शकत नाही'
Continues below advertisement
Layer_154
Continues below advertisement
1/6
आमिर खान आणि किरण राव यांनी 15 वर्षाच्या संसारानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. किरण विना मी माझे जीवन अधुरे समजतो, तिच्या शिवाय जगण्याची कल्पनाही करवत नाही असं आमिर खान म्हणायचा.
2/6
आमिरने आतापर्यंत पडद्यावर अनेक अभिनेत्रींशी रोमान्स केला आहे, पण किरण राव हेच आपले खरे प्रेम असल्याची जाहीर कबुली त्याने अनेकदा दिलीय. आमिर खान आणि किरण राव यांची पहिली भेट 2001 साली लगानच्या सेटवर झाली. किरण राव त्या चित्रपटाची असिस्टंट डायरेक्टर होती.
3/6
एके दिवशी किरणचा आमिरला फोन आला. त्या दोघांनी सुमारे अर्धा तास एकमेकांशी गप्पा मारल्या. त्यावेळी आपल्याला किरणशी बोलून खूप चांगलं वाटलं अशी आमिरची भावना होती.
4/6
त्यानंतर या दोघांतील मैत्री वाढत गेली, मैत्रीचे रुपांत नंतर प्रेमात झाले. तीन वर्षांच्या डेटिंगनंतर त्यांनी 2005 साली लग्न करण्याचा निर्णय घेतला. आमिर आणि किरण यांना एक मुलगा असून आझाद राव खान असं त्याचं नाव आहे.
5/6
निर्माती, दिग्दर्शिका आणि स्क्रिप्ट रायटर असलेली किरण राव एका शाही परिवाराची सदस्य आहे. तिचे आजोबा हे तेलंगणातील वानापार्थीचे राजे होते.
Continues below advertisement
6/6
आता या दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आपण या पुढेही चित्रपट आणि विविध प्रोजेक्टच्या माध्यमातून एकत्रित काम करत राहू असं आमिर आणि किरण रावने स्पष्ट केलं आहे.
Published at : 03 Jul 2021 02:02 PM (IST)