Bollywood: 'आवाज चांगला नाहीये..!' आमिर खानच्या या वाक्याने राणी मुखर्जी दुखावलेली; अभिनेत्रीने सांगितलं गुपित
राणी मुखर्जीने 1996 साली 'राजा की आयेगी बारात' या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. राणीचा 2000 सालच्या टॉप हाय पेड अभिनेत्रींच्या यादीत समावेश होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराणीने आमिर खानसोबत 'गुलाम' नावाचा चित्रपट केला होता. या चित्रपटातील अभिनयाने राणीने सर्वांची मनं जिंकून घेतली होती.
पण त्या चित्रपटात राणीची एक गोष्ट बदलण्यात आली होती आणि की म्हणते तिचा आवाज. चाहत्यांना आजही त्या चित्रपटातील राणीच्या आवाजाची उणीव भासते, पण जेव्हा तो चित्रपट प्रदर्शित झाला होता त्यावेळी त्या चित्रपटातील राणीचा आवाज ही तिचा आवाज नव्हता, हे फार कमी लोकांना माहीत होतं.
राणीने त्यावेळी डबिंगसाठी होकार दिला होता, पण काही वेळाने तिला जाणवलं की आवाज ही माणसाची ओळख आहे. राणी त्यावेळी निर्मात्याला किंवा कोणालाही काही बोलली नव्हती, कारण ती इंडस्ट्रीत नवीन होती.
मेलबर्नच्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये राणी मुखर्जीने या बाबतचा खुलासा केला. राणी म्हणाली- 'मी करिअरच्या शिखरावर असताना मला गुलाम चित्रपटात काम मिळालं, त्यावेळी माझा आवाज डब करण्यात आला होता, कारण मी नवखी होती आणि हा माझा दुसरा बॉलिवूड चित्रपट होता.
'त्यावेळी माझ्या आवाजाचं डबिंग करण्यात आलं, कारण त्यांच्या मते मुख्य अभिनेत्रीचा आवाज मधुर आणि पातळ लयातील असतो. स्त्रियांचा माझ्यासारखा कठोर आवाजही असू शकतो, यावर त्यांचा विश्वास नव्हता. मी नवखी असल्यामुळे काही बोलू शकले नाही. पण मला खूप वाईट वाटलं आणि आजही मी त्या चित्रपटाशी जोडू शकलेली नाही.
पुढे राणी म्हणाली- 'आमिरलाही असंच वाटलं, त्यानेही सांगितलं होतं की माझा आवाज चांगला नाही. 'गुलाम' आणि 'कुछ कुछ होता है' हे चित्रपट एकाच वेळी बनले होते. अशा परिस्थितीत मी करण जोहरचे आभार मानू इच्छिते की त्याच्यासोबत असं घडलं नाही.
राणी म्हणाली- करणने गुलाम पाहिला होता. त्याने मला नक्की डब करायचं नाही ना? असं विचारलं आणि मी साफ नकार दिला. नंतर करणने सांगितलं की, तू तुझ्या खऱ्या आवाजात स्वत:साठी डब करावं अशी माझी इच्छा आहे. नंतर जेव्हा आमिरने 'कुछ कुछ होता है' पाहिला तेव्हा तो म्हणाला की- बेब्स, आम्ही खूप मोठी चूक केली की तुझ्या आवाजासाठी दुसऱ्याकडून डब करून घेतला.