800 Trailer: 800 च्या ट्रेलर लाँच इव्हेंटला सचिन तेंडुलकरनं लावली हजेरी; पाहा फोटो

मुथय्या मुरलीधरनच्या (Muttiah Muralitharan) आयुष्यावर आधारित असणारा 800 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Sachin Tendulkar, Muttiah Muralitharan

1/9
श्रीलंकेचा क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरनच्या (Muttiah Muralitharan) आयुष्यावर आधारित असणाऱ्या 800 या चित्रपटाचा ट्रेलर लाँच इव्हेंट नुकताच पार पडला.
2/9
800 या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच इव्हेंटला सचिन तेंडुलकरनं हजेरी लावली होती.
3/9
सचिन तेंडुलकरनं ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये सांगितलं,'माझी आणि मुथय्या मुरलीधरन यांची पहिली भेट 1993 मध्ये झाली होती. तेव्हापासून आजपर्यंत आम्ही दोघे एकमेकांच्या संपर्कात आहोत.'
4/9
मुथय्या मुरलीधरनने इव्हेंटमध्ये सचिन तेंडुलकरचे आभार मानले. तो म्हणाला, 'मी सचिन तेंडुलकरचा खूप आभारी आहे की त्याने माझी विनंती मान्य केली आणि आज चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चला तो आला.'
5/9
800 या चित्रपटात मधुर मित्तल हा मुथय्या मुरलीधरनची भूमिका साकारणार आहे.
6/9
800 या चित्रपटाच्या ट्रेलरमधील मधुर मित्तलच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं आहे.
7/9
एम.एस. श्रीपती यांनी 800 या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.
8/9
800 हा चित्रपट 6 ऑक्टोबर 2023 रोजी रिलीज होणार आहे.
9/9
800 चित्रपटाच्या माध्यमातून मुथय्या मुरलीधरनचे आयुष्य रुपेरी पडद्यावर पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.
Sponsored Links by Taboola