Birthday Special : विलासरावांचा 'तो' सल्ला अन् रितेशचं आयुष्य बदललं!
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आपल्या स्पष्टवक्तेपणामुळं प्रसिद्ध होते. त्यांच्या हजरजबाबीपणा देखील अनेकवेळा अनुभवायला मिळायचा. त्यांचा मुलगा अभिनेता रितेश देशमुखनं देखील त्यांच्या स्पष्टवक्तेपणाची काही उदाहरणं सांगितली आहेत. (Photo:@facebook/Riteishd)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरितेशनं माझा कट्ट्यावर बोलताना सांगितलं होतं की, ज्यावेळी मला चित्रपटाची ऑफर मिळाली होती, त्यावेळी मी बाबांना (विलासराव देशमुख) ही गोष्ट सांगण्यासाठी आलो. (Photo:@facebook/Riteishd)
त्यावेळी मला त्यांनी सांगितलेलं एक वाक्य आजही लक्षात आहे. ते मला म्हणाले की, तू तुझ्या नावाची काळजी घे मी माझ्या नावाची काळजी घेईल. (Photo:@facebook/Riteishd)
त्यांचं हे वाक्य मला नेहमी प्रेरणा देतं. तुम्हाला जे आयुष्यात करायचं आहे त्याची जबाबदारी आपणच घ्यायला हवी, असं रितेशनं कट्ट्यावर सांगितलं होतं(Photo:@facebook/Riteishd)
रितेशनं सांगितलं होतं की, आपल्याला चित्रपटाची ऑफर मिळाली होती. त्यानंतर मी त्यांना भेटायला गेलो तर त्यांनी डन असं सांगितलं. मग मीच त्यांना म्हणालो जरा थांबा, मला घरी याबाबत बोलावं लागेल.(Photo:@facebook/Riteishd)
मला जाणीव होती की आपले वडील मुख्यमंत्री आहेत. आपण असंच निर्णय घेऊ शकत नाही. आईला सांगितल्यावर त्यांनी होकार दिला. (Photo:@facebook/Riteishd)
मग मी बाबांना भेटायला गेलो. वर्षा बंगल्यावर त्यांना भेटलो आणि चित्रपट करणार असल्याचं सांगितलं. त्यावर ते म्हणाले तू अॅक्टिंग करणार आहेस का? मी हो असं सांगितलं. (Photo:@facebook/Riteishd)
त्यानंतर मी त्यांना म्हटलं की, सिनेमा चालला नाही तर लोकं विलासरावांच्या मुलाचा सिनेमा चालला नाही असं म्हणत तुमच्यावर टीका होईल. माझी काही ओळख नाही, तुमची ओळख आहे. त्यावर ते (विलासराव देशमुख) की, तू तुझ्या नावाची काळजी घे मी माझ्या नावाची काळजी घेईल. त्यांचं हे वाक्य मला नेहमी प्रेरणा देतं. तुम्हाला जे आयुष्यात करायचं आहे. त्याची जबाबदारी आपणच घ्यायला हवी, असं रितेशनं सांगितलं. त्यानंतर ही फिल्म फायनल झाली, असं रितेशनं सांगितलं होतं. (Photo:@facebook/Riteishd)
(Photo:@facebook/Riteishd)
(Photo:@facebook/Riteishd)