Bipasha Basu : बिपाशा बसूच्या प्रेग्नेंसीच्या अफवांनी पुन्हा एकदा पकडला जोर..
Bipasha Basu : अभिनेत्री बिपाशा बसू (Bipasha Basu) आणि अभिनेता करण सिंग ग्रोव्हर (Karan Singh Grover) हे ग्लॅमरच्या दुनियेतील सर्वात चर्चित सेलिब्रिटी जोडप्यांपैकी एक आहेत. (photo:bipashabasu/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदोघांचे लग्न झाल्यापासून त्यांचे चाहते अभिनेत्रीच्या प्रेग्नेंसीबद्दल अंदाज लावत होते, मात्र बिपाशाने नेहमीच या गोष्टीचे खंडन केले आहे. (photo:bipashabasu/ig)
तथापि, तिच्या प्रेग्नेंसीच्या अफवांनी पुन्हा एकदा जोर पकडला आहे. नुकतीच अभिनेत्री तिच्या कुटुंबासह डिनर आउटिंगला स्पॉट झाली होती. (photo:bipashabasu/ig)
‘महिला दिना’च्या दिवशी बिपाशा बसू पती करण सिंग ग्रोवर आणि कुटुंबासह मुंबईत स्पॉट झाली होती. (photo:bipashabasu/ig)
यादरम्यान अभिनेत्री एका रेस्टॉरंटमध्ये कुटुंबासोबत डिनरचा आनंद लुटताना दिसली. या कौटुंबिक डिनरसाठी, बिपाशाने मोठ्या आकाराचा निळ्या रंगाचा शर्ट ड्रेस परिधान केला होता. यावेळी पती करणसोबत तिने फोटो पोज दिल्या. (photo:bipashabasu/ig)
सोशल मीडियावर हा व्हिडीओ समोर येताच नेटिझन्सनी तिच्या प्रेग्नेंसीबद्दल अंदाज बांधायला सुरुवात केली. एका चाहत्याने कमेंट केली की, ‘ती निश्चितपणे गर्भवती आहे... मम्मी ग्लोपासून ते मोठ्या आकाराच्या शर्टपर्यंत...’ त्याच वेळी, दुसऱ्याने लिहिले की, ‘मलाही वाटते, ती गर्भवती आहे.’ एक दोन नव्हे तर अनेक चाहत्यांनी बिपाशा गरोदर असल्याचा अंदाज बांधला आहे. (photo:bipashabasu/ig)