PHOTO : Divya Agrawal ने जिंकला Bigg Boss OTT रिअॅलिटी शो
शमिता शेट्टी आणि निशांत भट यांना मागे टाकत दिव्या अगरवाल (Divya Agrawal) बिग बॉस ओटीटी या कार्यक्रमाची विनर बनली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिव्या अगरवालला 25 लाख रुपयांचा इनाम मिळाला आहे. या फिनालेमध्ये निशांत भट हा दुसऱ्या क्रमांकावर राहिला तर शमिता शेट्टी ही तिसऱ्या क्रमांकावर राहिली आहे.
बिग बॉस ओटीटी हा शो पहिल्यांदाच ओटीटी प्लॅटफॉर्मवर आयोजित करण्यात आला होता. या शोचा होस्ट दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर होता. (Photo:Divya Agarwal /FB)
दिव्या अगरवालचा या शोमधील प्रवास हा खडतर ठरला होता. (Photo:Divya Agarwal /FB)
शमिता शेट्टीसोबत तिची सुरुवातीला चांगली बॉन्डिंग होती पण नंतर त्यामध्ये दुरावा येण्यास सुरुवात झाली. या दोघींमध्ये अनेक मुद्द्यावरुन भांडणं सुरु झाली. (Photo:Divya Agarwal /FB)
दिव्याचा बॉयफ्रेन्ड वरुण तिला ज्यावेळी भेटायला आला त्यावेळी ती इमोशनल झाल्याचं सर्वांनीच पाहिलं. वरुणला पाहताच दिव्या रडायला लागली. (Photo:Divya Agarwal /FB)
बिग बॉस ओटीटी हा कार्यक्रम पहिल्यांदाच लॉन्च करण्यात आला. सहा आठवडे चाललेल्या या कार्यक्रमाची सुरुवात 8 ऑगस्टला झाली होती.
दिव्या अगरवालने या आधीही अनेक रियालिटी शोमध्ये भाग घेतला आहे. ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून तिचे फॅन फॉलोवर्सची संख्या मोठी आहे. (Photo:Divya Agarwal /FB)