Bigg Boss marathi season 6: बिग बॉसच्या घरातून 2 तगड्या स्पर्धकांची EXIT; वाइल्ड कार्ड स्पर्धक होणार बाद, चाहते शॉक
Bigg Boss marathi season 6 Elimination: बिग बॉसच्या घरातून आज कोणते दोन स्पर्धक एलिमिनेट होणार, याची माहिती लवकरच समोर येईल.

Bigg Boss Marathi 6
1/8
बिग बॉस मराठीचा सहावा सिझन सध्या प्रेक्षकवर्गामध्ये प्रचंड गाजतो आहे. तगडे कलाकारांची एक्झिट झाली. तर, काही धुरंधर प्लेअर अजूनही शोची रंगत वाढवत आहेत. बिग बॉसची ट्रॉफी नेमकं कोण जिंकणार? याकडे सर्वांच्याच नजरा आहे.
2/8
वाइल्ड कार्ड स्पर्धकांची बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाल्यापासून, घरातील समीकरणं बदलत गेली. दरम्यान, बिग बॉसच्या घरात आता एक नवा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे.
3/8
मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून एक नसून दोन स्पर्धकांची एक्झिट होणार आहे. दोन स्पर्धकांना घरातून निरोप घ्यावा लागणार आहे.
4/8
बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री केलेल्या संकेत पाठकचा प्रवास याच आठवड्यात संपणार असल्याची माहिती आहे. माहितीनुसार, नॉमिनेट झालेल्या स्पर्धकांपैकी संकेतला खूप कमी मतं मिळाले आहेत, अशी माहिती आहे.
5/8
कमी मतं मिळाल्यामुळे संकेतला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावं लागेल, असं सांगितलं जातआहे.
6/8
दरम्यान, संकेत पाठकसोबत आणखी एक सदस्य एलिमिनेट होणार असल्याची चर्चा आहे. संकेतसोबत छोटा डॉन अर्थात प्रभू शेळके एलिमिनेट होणार असल्याचं कळतंय.
7/8
बिग बॉसच्या घरात या आठवड्यात तीन स्पर्धक बॉटम 3 मध्ये होते. ज्यातून रेवा कौरासे सुरक्षित झाली. तर, इतर दोन प्रभू शेळके आणि संकेत पाठक एलिमिनेट होतील, अशी माहिती आहे.
8/8
दरम्यान, दोन स्पर्धकांची एक्झिट झाल्यानंतर, सागर कारंडे, अनुश्री माने, तन्वी कोलते, दिपाली सय्यद, राखी सावंत, राकेश बापट या स्पर्धकांमध्ये काटे की टक्कर होणार आहे. या स्पर्धकांमध्ये कोण बिग बॉसच्या घरात ट्रॉफी घेऊन जाणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
Published at : 29 Mar 2026 02:45 PM (IST)