Bigg Boss Marathi Season 5 : कसं आहे बिग बॉस मराठीचे घर? पहिली झलक माझावर!

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीचं घर कसं असणार याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली असते, एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी घेऊन आलो आहोत बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनच्या हाऊसची झलक!

मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला बिग बॉस मराठीच्या पाचव्या (Bigg Boss Marathi Season 5) सिझनची प्रतीक्षा अखेर संपली आहे.

1/10
बिग बॉसच्या सिझनची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. यंदा बिग बॉसच्या होस्टच्या खुर्चीत रितेश देशमुख बसणार आहे. त्यामुळे तो त्याच्या स्टाईलने घरातल्या स्पर्धकांची शाळा घेणार आहे.
2/10
हा आहे बिग बॉस मराठीचा मुख्य दरवाजा... इथून स्पर्धकांचा होणार गृहप्रवेश आणि इथूनच बाहेर पडणार सिझनचा विजेता!
3/10
हा आहे घरातला गार्डन एरिया...या ठिकाणी अनेक टास्कही होतात आणि अनेक गॉसिप्सही होतात.
4/10
ही आहे, घरातील प्रमुख अर्थात कॅप्टनची रूम, जी सजलीय क्रिस्टलने! इथे दर आठवड्याला एक कॅप्टन राहायला येत असतो जो त्या आठवड्यात सेफ झोनमध्ये असतो!
5/10
हे आहे स्वयंपाकघर, इथं सर्व स्पर्धक चमचमीत पदार्थ तयार करून सर्वांची भूक भागवतात, या सीझनमध्ये बघूया कोणाचा ताबा किचनवर असेल!
6/10
कलर्स मराठी वाहिनीवर रात्री 9 वाजता बिग बॉस मराठीचा ग्रँड प्रिमिअर होणार आहे. त्यामुळे घरात कोण कोण जाणार हे आता अवघ्या काही तासांमध्ये समोर येईल.
7/10
बिग बॉसच्या घराप्रमाणेच प्रेक्षकांना तसेच स्पर्धकांना घरातलं बाथरुम कसं असेल याची देखील उत्सुकता असते. तर, यंदाचं घरातलं बाथरुम हे लॅव्हिश असं काचेचं असणार आहे.
8/10
तर हे आहे कॅप्टन व्यतिरिक्त सर्व स्पर्धकांचं एकत्र बेडरूम!
9/10
काही दिवसांपूर्वीच 'बिग बॉस मराठी'चा धमाकेदार प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला. या प्रोमोवरुन रितेश भाऊमुळे 'बिग बॉस' आणखी ग्रँड होणार असल्याचं स्पष्ट झालं.
10/10
हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारा संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार रितेश देशमुख यंदाचा सीझन वाजवायला सज्ज आहे.
Sponsored Links by Taboola