तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेल्या मराठमोळ्या अभिनेत्याला 'येड लागलं प्रेमाचं'; गुपचूप उरकला साखरपुडा, लॉन्ग टाईम गर्लफ्रेंडसोबत नातं केलं ऑफिशिअल

त्यापूर्वी मराठमोळ्या जय दुधाणेनं स्प्लिट्सव्हिला हा रिअॅलिटी शोसुद्धा जिंकला होता. तेव्हापासूनच तो प्रसिद्धीझोतात आला होता. या शोनंतर त्याच्या चाहत्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अशातच लाखो तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेल्या जय दुधाणेनं गपचूप साखरपुडा उरकला आहे.

'बिग बॉस मराठी' फेम जय दुधाणेनं नुकताच साखरपुडा केल्याचं समोर आलं आहे. जय दुधाणेनं नुकताच त्याच्या गर्लफ्रेंडसोबत साखरपुडा उरकला.
जय दुधाणेनं आपली लॉन्ग टाईम गर्लफ्रेंड हर्षला पाटीलसोबत साखरपुडा केल्याचं समोर आलं आहे. दोघांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
जय दुधाणेनं क्लासी अन् स्टायलिश अंदाजात त्याची लॉन्ग टाईम गर्लफ्रेंड हर्षला पाटील हिला प्रपोज केलं.
हर्षला पाटील ही जयची गर्लफ्रेंड असून ती व्हिडीओ क्रिएटर आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 1 लाख 72 हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत.
2025 वर्ष सुरू होताच अनेक कलाकार लग्नाच्या बेडीत अडकले असून त्यांनी त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.
अशातच आता 'बिग बॉस मराठी' मधून घराघरात पोहोचलेला आणि लोकप्रिय झालेल्या जय दुधाणेनं देखील त्याच्या नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे.
जयने गुपचूप साखरपुडा उरकला असून त्याने सोशल मीडियावर त्याच्या होणाऱ्या पत्नीसोबतचा फोटो शेअर केला आहे.
हर्षला पाटील अगोदर जय दुधाने सिमरन बावा हिला डेट करत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र दोघांच्या नात्याबद्दल कधीच कोणी काही बोललेलं नाही.
जयच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे, 29 एप्रिलला शुभेच्छा देताना हर्षलाने पाठमोऱ्या असलेल्या जय सोबत काही फोटो शेअर करून चाहत्यांना चकित करून टाकले होते.
जयनंसुद्धा हर्षला त्याची गर्लफ्रेंड असल्याचं जाहीर केलं आहे. 'माझ्या लाडक्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा', असं म्हणत जयनं हर्षलासोबत रोमँटिक फोटो शेअर केलेत.