Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीच्या घरात चुरशीची लढत, तन्वीनंतर फायनलिस्ट कोण? कोणता स्पर्धक आऊट होणार?
Bigg Boss Marathi Season 6: बिग बॉस मराठीचा सहावा सिझन आता अंतिम टप्प्यात. या आठवड्यात कोणता स्पर्धक एलिमिनेट होणार?

Bigg Boss Marathi 6
1/8
Bigg Boss Marathi 6 Who Will Be Eliminated This Week: बिग बॉस मराठीचा सहावा सिझन हा शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. फिनालेमध्ये जाण्यासाठी स्पर्धकांची धडपड सुरु आहे. बिग बॉसची ट्रॉफी कोण जिंकणार? असा प्रश्न प्रेक्षकांकडून उपस्थित होत आहे.
2/8
बिग बॉसच्या घरातील पहिली फायनलिस्ट ही तन्वी कोलते ठरली. टास्कमध्ये विजयी मिळवत तन्वीनं तिकीट टू फिनालेचं तिकीट मिळवलं. राकेश बापटला हरवून तिनं तिकीट टू फिनालेचं तिकीट मिळवलं.
3/8
हाऊस कॅप्टन असल्यामुळे रेवा कौरासे सेफ आहे. दरम्यान, खरी चुरशीची लढत 5 स्पर्धकांमध्ये सुरू आहे. दिपाली सय्यद अनुश्री माने, विशाल कोटियन, राखी सावंत आणि राकेश बापट यांच्यावर एलिमिनेशनची टांगती तलवार आहे.
4/8
आपल्या आवडत्या स्पर्धकाला एलिमिनेट होण्यापासून वाचवण्यासाठी प्रेक्षकांनी व्होटिंग केलं. तन्वीनंतर कोणता स्पर्धक फायनलिस्ट होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
5/8
सध्या नेटकऱ्यांनीही इंटरनेटवर तर्क वितर्क लावले आहेत. शनिवार - रविवार भाऊचा धक्का होईल. यावेळी 5 पैकी एका स्पर्धकाला बिग बॉसचं घर सोडावं लागेल.
6/8
सध्या नेटकऱ्यांनी इंटरनेटवर तर्क वितर्क लावले आहेत. शनिवार - रविवार भाऊचा धक्का होईल. यावेळी 5 पैकी कोणत्या एका स्पर्धकाला बिग बॉसचं घर सोडावं लागेल, हे कळेल.
7/8
फायनलिस्ट लिस्टमध्ये नेमकं कोण जाणार? कोणता स्पर्धक बाद होणार? अशी चर्चा सध्या प्रेक्षकांमध्ये रंगली आहे.
8/8
बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनचा फिनाले पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. 19 एप्रिल रोजी महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. यंदाची ट्रॉफी नेमकं कोण जिंकणार? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.
Published at : 10 Apr 2026 07:20 PM (IST)