Bigg Boss Marathi 6: बिग बॉसच्या घरात डबल Eviction! प्रभू शेळकेनंतर कोण घराबाहेर जाणार? काटा अन् टोळी टीम्सना धक्का बसणार!
Bigg Boss mArathi:
Continues below advertisement
BBM6
Continues below advertisement
1/8
बिग बॉस मराठी 6 मध्ये या आठवड्यात डबल एव्हिक्शन होणार असल्याचं रितेश भाऊंनी सांगितल्यानं घरातील वातावरणच बदललं आहे.
2/8
एकाच आठवड्यात दोन स्पर्धक बाहेर पडणार असल्यानं प्रेक्षकांसह घरातील सदस्यांनाही मोठा धक्का बसणार आहे.
3/8
मिळालेल्या माहितीनुसार, पहिलं नाव आहे प्रभू शेळके याचं. ‘छोटा डॉन’ म्हणून ओळखला जाणारा प्रभू घराबाहेर गेल्याने ‘काटा’ ग्रुपची ताकद कमी झाली आहे.
4/8
दरम्यान, या आठवड्यात अजून एक सदस्य बाहेर जाणार असल्याची घोषणा ‘भाऊचा धक्का’मध्ये रितेश देशमुख यांनी केली होती.
5/8
त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की, दोन्ही ग्रुपमधून प्रत्येकी एक सदस्य बाहेर पडणार आहे.
Continues below advertisement
6/8
या आठवड्यात एकूण सात स्पर्धक नॉमिनेशनमध्ये होते. त्यात दिपाली सय्यद, प्रभू शेळके, राकेश बापट, रेवा कौरासे, अनुश्री माने, सागर कारंडे, संकेत पाठक यांचा समावेश होता.
7/8
यापैकी ‘काटा’ ग्रुपमधून प्रभू बाहेर पडला आहे, तर दुसऱ्या एव्हिक्शनसाठी ‘टोळी’ ग्रुपमधील सदस्यांवर लक्ष केंद्रीत झालं होतं. सोशल मीडियावर चर्चेनुसार, संकेत पाठक याचा प्रवास संपल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
8/8
सध्या घरात उरलेल्या स्पर्धकांची संख्या आता केवळ आठवर आली आहे. यात अनुश्री, राकेश, तन्वी, सागर, दिपाली, रेवा, विशाल आणि राखी यांचा समावेश आहे. स्पर्धा आता अधिक रंगतदार होत चालली असून, विजेतेपदासाठी जोरदार चुरस पाहायला मिळत आहे.
Published at : 28 Mar 2026 03:04 PM (IST)
= 8">