Bigg Boss Marathi 3: कोण ठरणार बिग बॉस मराठीच्या या पर्वाचा महाविजेता? उद्या रंगणार बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले!
Bigg Boss Marathi 3 : 100 दिवासांपूर्वी बिग बॉस मराठीच्या घरात नव्या सदस्यांची एन्ट्री झाली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया प्रवासाची सुरुवात झाली 15 सदस्यांसोबत, त्यानंतर आदिश आणि नीथा शेट्टी यांची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आणि आता बघता बघता बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आता उरले आहेत फक्त टॉप 5 स्पर्धक.
विशाल निकम, जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे, विकास पाटील, मीनल शहा या पाच सदस्यांमध्ये चुरशीची स्पर्धा रंगणार आहे.
बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांनी कधी भांडणाने तर कधी रडण्याने तर कधी त्यांच्यातील प्रेमाने तर कधी त्यांच्या मैत्रीने बिग बॉसच्या घराला घरपण आले.
पण आता हा प्रवास येत्या रविवारी संपणार आहे.
सध्या घराघरांत 'बिग बॉस मराठी 3' कार्यक्रमाची चर्चा सुरू आहे. आता या टॉप 5 मधून कोणता सदस्य ठरणार बिग बॉस मराठी सिझन 3 चा महाविजेता हे जाणून घेण्याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे.
बिग बॉसच्या घराचा दरवाजा आता शेवटचा उघडला जाणार आहे.
फरक इतकाच असणार की, यावेळेस दरवाज्या पलीकडे उभे असणार आहेत बिग बॉस मराठीच्या या पर्वातील टॉप 2 सदस्य आणि त्यातील एक या पर्वाचा महाविजेता ठरणार आहे.