'Bigg Boss'च्या घरात अंकिता लोखंडेने केलं हे कृत्य चाहते हैराण!
Ankita Lokhande,
1/10
'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातील वादांमुळे हा कार्यक्रम कायम चर्चेत असतो.
2/10
या कार्यक्रमात सहभागी झालेल्या स्पर्धकांपैकी अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) कायमच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आता नुकत्याच पार पडलेल्या भागात अंकिताने विकीला चप्पलने मारलं आहे.
3/10
अंकिता लोखंडे आणि विकी जैन कधी प्रेग्नंसी तर कधी सुशांत सिंह राजपूतबद्दल (Sushant Singh Rajput) भाष्य केल्यामुळे चर्चेत असतात.
4/10
आता विकीने वापर केला असल्याचा आरोप अंकिताने केला आहे. नॅशनल टीव्हीवरील पती-पत्नीच्या भांडणाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तसेच दोघांच्या सतत होत असलेल्या भांडणामुळे घरातील सदस्यदेखील हैराण झाले आहेत.
5/10
'बिग बॉस 17'च्या नुकत्याच पार पडलेल्या भागात अनेक स्पर्धकांचं जेवणावरुन भांडण झालेलं पाहायला मिळालं. अभिषेक कुमार आणि खानजादीमध्ये हे भांडण झालं होतं. पुढे या भांडणात विकी जैन आणि ईशा मालवीयदेखील सहभागी झाले.
6/10
भांडणाआधी विकी अंकितासोबत मजा-मस्ती करत होता. त्यावेळी मजा-मस्ती करताना अंकिताने विकीला चप्पलने मारलं. अंकिताने अनेकदा विकीला चप्पलने मारलं आहे. त्यामुळे घरातील मंडळीदेखील हैराण झाले आहेत. तर दुसरीकडे अंकिता आणि विकीच्या या मजामस्तीने प्रेक्षकांची मात्र मने जिंकली आहेत.
7/10
'बिग बॉस 17'मधील अंकिता लोखंडे आणि विकी जैनच्या मजेशीर भांडणाची मजा सनी आर्यने घेतली आहेत. सनी मोठ-मोठ्याने ओरडत होता की, एका पतीने नॅशनल टीव्हीवर पत्नीला चप्पलने मारलं आहे. तर दुसरीकडे अंकिता आणि विकीला मात्र अश्रू अनावर झाले होते.
8/10
'पवित्र रिश्ता' फेम अंकिता लोखंडेला सर्वच ओळखतात. आता 'बिग बॉस'मुळे तिचा पती विकी जैनदेखील घराघरांत पोहोचला आहे.
9/10
विकी जैनचा जन्म 1986 मध्ये झाला असून तो एक उद्योगपती आहे. अंकिता आणि विकी 2021 मध्ये लग्नबंधनात अडकले. विकी जैन कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे. त्याच्याकडे अनेक महागड्या आलिशान गाड्या आहेत.
10/10
सुशांत सिंह राजपूतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर एका पार्टीत अंकिता लोखंडे आणि विकी जैनची पहिली भेट झाली होती. या पार्टीनंतर त्यांची चांगली मैत्री झाली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि संसार थाटण्याचा निर्णय घेतला.
Published at : 22 Nov 2023 12:36 PM (IST)