BB 14 Winner Prediction | Rubina Dilaik ठरली Bigg Boss 14ची विजेती? पाहा अखेरच्या टप्प्यावर येणार कोणती वळणं

1/6
एकिकडे रुबीनाचं नाव विजेतेपदी घेतलं जात असतानाच दुसरीकडे राहुल वैद्यचं नाव हे उपविजेतेपदी घेतलं जात आहे. त्यामुळं अंतिम फेरीमध्ये ज्यावेळी मूळ भागाचं प्रसारण होईल तेव्हा या दोघांमध्येही खऱ्या अर्थानं काँटे की टक्कर पाहायला मिळेल यात शंका नाही.
2/6
अंतिम भागामध्ये सर्व स्पर्धक आपले परफॉर्मन्स देतील आणि ज्यानंतर अंतिम 5 स्पर्धाकांतून एका स्पर्धकाला एविक्ट करण्यात येईल. अशा प्रकारे अखेर बिग बॉस 14(Bigg Boss 14) च्या विजेतेपदी येणाऱ्या व्यक्तीच्या नावाची घोषणा करण्यात येणार आहे.
3/6
प्रेक्षक आणि चाहत्यांच्या मते ही रुबीनाच असणार आहे. तेव्हा आता अगदी ठामपणे मांडण्यात आलेले हे अंदाज आणि तर्कवितर्क कुठवर खरे ठरतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
4/6
‘कलर्स’ वाहिनीवर आज रात्री 9 वाजल्यापासून या कार्यक्रमाच्या प्रसारणाला सुरुवात होणार आहे.
5/6
रुबीनाच ‘बिग बॉस’च्या विजेतेपदी पोहोचल्याची अनौपचारिक घोषणा सोशल मीडियावर झाली आहे, किंबहुना तिचं नावही ट्रेंडमध्ये आलं आहे. इतकंच नव्हे तर या कार्यक्रमातून उपविजेतेपदी कोणाच्या नावाची घोषणा होणार याचीही चर्चा आता सुरु झाली आहे.
6/6
टेलिव्हिजन विश्वातील वादग्रस्त आणि चर्तेच असणारा कार्यक्रम बिग बॉस 14(Bigg Boss 14) आता अंतिम फेरीपर्यंत पोहोचला आहे. मुंबईतील गोरेगाव इथं या कार्यक्रमाचं चित्रीकरणही सुरु आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अभिनेत्री आणि स्पर्धक रुबीना दिलैक ही या कार्यक्रमाचं जेतेपद पटकावून जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.
Sponsored Links by Taboola