Bigg Boss 14 Finale : कोण होणार बिग बॉस 14 चा विजेता, उत्सुकता शिगेला, 'हे' आहेत अंतिम पाच स्पर्धक
राखी सावंतची एन्ट्री झाल्यापासून ती सतत चर्चेत आहे. बिग बॉसनं लाख रुपयांचा चेक घेऊन सरळ शेवटच्या फेरीत सहभागी होऊ शकतात, असं सांगितलं होतं. मात्र त्यावेळी त्यांना अट अशी घालण्यात आली होती की जर ते जिंकले तर त्यांनी जिंकलेल्या पैशांतून 14 लाख परत करायचे. त्या अटीला राखी सावंत, अली गोनी आणि राहुल वैद्य यांना सामोरं जावं लागलं. त्यावेळी जो स्पर्धक त्या 14 लाख रुपयांचा चेक घेण्यास उत्सुक असता त्याचे शेवटच्या फेरीतील स्थान पक्के समजले गेले असते. अशावेळी राखीनं संधीचा फायदा करुन घेतला आहे. आणि तिनं कसलाही विचार न करता सगळ्यात पहिल्यांदा चेक उचलला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनिक्की तांबोळी ही देखील सुरुवातीपासून तगडी स्पर्धक मानली जात आहे. बिग बॉसने घरातील सर्व सदस्यांना एक टास्क दिला होता. मात्र, टास्कच्या नियमांचे उल्लघंन निक्कीने केले. यामुळे बिग बॉस निक्कीला फटकारले होते.
बिग बॉसचा 14 वा सीझन आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. त्यात सहभागी झालेले स्पर्धक हे आपले स्थान वाचविण्यासाठी धडपडताना दिसत आहे. राहुल वैद्य या सीझनचा विजेतेपदाचा सर्वात मोठा दावेदार मानला जात आहे. प्रेक्षकांना त्याचा गेम चांगलाच आवडला आहे.
रुबिनाची फॅनफॉलोइंग मोठी आहे. रुबिना विजेता होईल असा अनेकांचा अंदाज आहे. प्रेक्षक आपापल्या आवडत्या स्पर्धकाला सपोर्ट करताना दिसत आहेत.
टीव्ही कलाकार अली गोनीदेखील फायनलमध्ये आहे. अली गोनी देखील विजेतेपदाच्या शर्यतीत आहे. त्याने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. त्याचाही फॅन फॉलोईंग मोठा आहे.
‘बिग बॉस 14’ चं पर्व आता अंतिम टप्प्यात आलं आहे. उद्या रविवारी बिग बॉसचा फिनाले पार पडणार आहे. रुबिना दिलाईक, अभिनव शुक्ला, अली गोनी, राखी सावंत आणि राहुल वैद्य हे पाच जण फिनालेमध्ये पोहोचले आहेत. यापैकी कोण बिग बॉसची ट्रॉफी जिंकणार, याची उत्सुकता ताणली गेली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -