Rahul Vaidya Photo : मराठमोळा राहुल वैद्य बिग बॉसचा उपविजेता, जाणून घ्या त्याच्या प्रवासाबद्दल

1/10
अनेक महिन्यांपासून सुरु असलेल्या आणि विविध घडामोडींनी चर्चेत आलेल्या बिग बॉस 14 चा निकाल काल रात्री उशीरा लागला. यात Rubina Dilaik बिग बॉस 14 ची विजेती बनली. राहुल वैद्य बिग बॉस सीझन 14 चा पहिला उपविजेता ठरला आहे. या फोटोंमधून आपण जाणून घेणार आहोत. राहुलच्या प्रवासाबद्दल...
2/10
राहुलनं लोकप्रिय ठरलेल्या सहारावरील "झूम इंडिया" या शोचं अॅंकरिंग केलं आहे. तसेच शादी नं 1, जिज्ञासा, हॉट मनी आणि क्रेजी 4 या चित्रपटासाठी पार्श्वगायन केलं आहे.
3/10
राहुलनं काही चित्रपटांसाठी तसेच मालिकांसाठी पार्श्वगायन देखील केलं आहे. त्याने अमेरिका, बांग्लादेश आणि मालदीवसह अन्य काही देशांमध्ये लाईव्ह शो केले आहेत.
4/10
इंडियन आयडलमध्ये तो तिसऱ्या स्थानावर राहिला होता. इंडियन आयडलनंतर त्यानं तेरा इंतजार नावाचा म्यूझिक अल्बम केला. साजिद-वाजिद यांनी त्याच्या या पहिल्या अल्बमला संगीत दिलं होतं.
5/10
लहान असतानाच त्याने विविध संगीतस्पर्धांमध्ये भाग घेतला. मिठीबाई महाविद्यालयात बारावीत शिकत असताना त्याने इंडियन आयडॉल या स्पर्धेत भाग घेतला होता.
6/10
एम.एस.ई.बी मध्ये अभियंता असलेल्या वडिलांच्या पोटी जन्मलेल्या राहुलचे बालपण मुंबईमध्ये गेले. येथेच त्याने सुरेश वाडकर यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले.
7/10
प्रेक्षकांना त्याचा गेम चांगलाच आवडला होता. जरी तो उपविजेता ठरला असला तरी चाहत्यांच्या मते तोच खरा विजेता आहे. या निकालानंतर राहुलवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
8/10
राहुल वैद्य गायक आहे. राहुलने बिग बॉस हिंदी मध्ये स्पर्धक म्हणून प्रवेश घेतला होता. राहुल वैद्य या सीझनचा विजेतेपदाचा सर्वात मोठा दावेदार मानला जात होता.
9/10
राहुल वैद्य बिग बॉस सीझन 14 चा पहिला उपविजेता ठरला आहे तर निक्की तांबोळी दुसरी उपविजेती ठरली आहे.
10/10
सोशल मीडियावर आधीच याबाबत शक्यता व्यक्त केली जात होती की यावेळची विजेती Rubina Dilaik असेल आणि तसंच झालं. राहुल वैद्यला पराभूत करत तिने बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरलं.
Sponsored Links by Taboola