'बाप्पी दा' यांच्या दागिन्यांबाबत मोठा निर्णय; पाहा फोटो!
ज्येष्ठ संगीतकार बप्पी लाहिरी (Bappi Lahiri) यांचे 15 फेब्रुवारी 2022 रोजी निधन झाले. वयाच्या 70 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या हटक्या संगीताने छाप सोडली. बप्पी लाहिरी हे कोणत्याही कार्यक्रमाला किंवा शोमध्ये वेगवेगळे दागिने घालून उपस्थित राहात होते.
त्यांच्या निधनानंतर त्यांचे दागिने कुठे ठेवले जातील? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला असेल. नुकताच बप्पी लाहिरी यांच्या मुलाने म्हणजेच बप्पा लाहिरी (Bappa Lahiri) यांनी बाप्पी दा यांच्या दागिन्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
बप्पा लाहिरी यांनी सांगितले की, बप्पी यांचे दागिने हे एका संग्रालयात ठेवले जाणार आहेत. त्यामुळे आता बप्पी लाहिरी यांचे दागिने त्यांचे चाहते पाहू शकतील. बप्पी लाहिरी यांच्याकडे सोन्याच्या दागिन्यांबरोबरच शूज, गॉगल आणि घडाळ यांचे देखील कलेक्शन होते.
2014 मधील एका रिपोर्टनुसार, बप्पी लाहिरी यांच्याकडे 754 ग्रॅम सोनं आणि 4.62 किलो चांदी होती. तसेच ते एकूण 20 कोटी रूपयांच्या संपत्तीचे मालक आहेत.
एका मुलाखतीमध्ये बप्पी लाहिरी यांनी सांगितले की, त्यांना अमेरिकेतील प्रसिद्ध पॉप स्टार एल्विस प्रेस्ली हा खूप आवडत होता. त्यांनी सांगितले , 'तो पॉप स्टार हा सोन्याची चैन घालत होता. मी एल्विस प्रेस्ली यांच्याकडे पाहून असा विचार करत होतो की, मला जेव्हा प्रसिद्ध मिळेल तेव्हा मी त्याच्यासारखी माझी इमेज तयार करेन.' तसेच बप्पी लाहिरी हे सोनं आणि चांदीच्या दागिन्यांना लकी देखील मानत होते. (all photo:bappilahiri_official_/ig)