PHOTO: 'बस्ती का हस्ती' एमसी स्टॅन आता रुपेरी पडदा गाजवणार!

Continues below advertisement

mc stan

Continues below advertisement
1/12
लोकप्रिय रॅपर एमसी स्टॅन (MC Stan) सध्या चर्चेत आहे. एमसी स्टॅन 'बिग बॉस 16' (Bigg Boss 16) या कार्यक्रमाचा विजेता ठरला होता.
2/12
एमसी स्टॅन हा लोकप्रिय रॅपर असून आता रुपेरी पडदा गाजवण्यासाठी तो सज्ज आहे.
3/12
'बस्ती का हस्ती' बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याने त्याच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
4/12
बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या (Salman Khan) 'फर्रे' (Farrey) या सिनेमाच्या माध्यमातून एमसी स्टॅन बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
5/12
या सिनेमाचा तो पार्श्वगायक असणार आहे. एमसी स्टॅनने इन्स्टा स्टोरी शेअर करत चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे.
Continues below advertisement
6/12
त्याने लिहिलं आहे,"सलमान खानच्या सिनेमाच्या माध्यमातून माझा प्लेबॅक डेब्यू". रॅपरच्या या घोषणेनंतर चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला शुभेच्छा देत आहेत.
7/12
'फर्रे' हा सिनेमा 24 नोव्हेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अलिजेह अग्निहोत्री, रोनित बोस रॉय, प्रसन्ना बिष्ट, जेन शॉ, साहिल मेहता आणि जूही बब्बर सोनी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.
8/12
या सिनेमाच्या माध्यमातून सलमानची भाची अलिजेह बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
9/12
एमसी स्टॅन हा लोकप्रिय रॅपर आहे. एमसी स्टॅनचं खरं नाव अल्ताफ शेख आहे. एसमी स्टॅन हा पुणेकर आहे. स्टॅनला अभ्यासाची आवड नव्हती.
10/12
वयाच्या 12 व्या वर्षी त्याने रॅप सॉन्ग गायला सुरुवात केली. एमसी स्टॅनचा प्रवास खूपच संघर्षमय आहे.
11/12
गरीबीत त्याचं बालपण गेलं आहे. तसेच अनेक रात्री त्याने फुटपाथवर जागून काढल्या आहेत. पण मेहनत मात्र तो करत राहिला आणि रॅप सॉन्गनेच त्याला रातोरात करोडपती बनवलं.
12/12
एमसी स्टॅनचं 'अस्तगफिरुल्लाह' हे गाणं चांगलच गाजलं आहे. या गाण्यात त्याने आपल्या संघर्षाचा प्रवास मांडला आहे. त्याचं 'वाटा' हे गाणंदेखील गाजलं आहे.
Sponsored Links by Taboola