In Pics: 'बिग बॉस मराठी 2' विजेता शिव ठाकरे थोडक्यात बचावला
Continues below advertisement
shiv thakre
Continues below advertisement
1/7
Actor Shiv Thakare Car Accident : बिग बॉस मराठी 2 चा विजेता शिव ठाकरे याच्या कारचा भीषण अपघात झाला असून त्याला मागून येणाऱ्या भरधाव वाहनानं धडक दिली. (photo: shivthakare9/ig)
2/7
यामध्ये शिव ठाकरेला दुखापत झाली आहे. शिव ठाकरे, त्यांचे जावई, बहीण आणि भाचा हे कारने शनिवारी सकाळी अमरावती वरुन परतवाडा येथे कामानिमित्त निघाले होते. त्यावेळी हा अपघात झाला.(photo: shivthakare9/ig)
3/7
सुदैवानं यामध्ये कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. (photo: shivthakare9/ig)
4/7
बिग बॉस फेम शिव ठाकरे आपल्या कुटुंबीयांसह अमरावतीवरुन प्रवास करत होता. यावेळी वळगाव भागात त्याच्या गाडीला एका टेम्पो ट्रॅव्हलरने मागून धडक दिली. (photo: shivthakare9/ig)
5/7
या अपघातात शिव ठाकरेसह त्याचे कुटुंबीय थोडक्यात बचावले असून शिवच्या चेहऱ्याला दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. आता त्यांची प्रकृती ठिक असून, तो अमरावती येथे घरी विश्रांती घेत आहेत.(photo: shivthakare9/ig)
Continues below advertisement
6/7
शिव ठाकरे, त्यांचे जावई, बहीण आणि भाचा हे कारने शनिवारी सकाळी अमरावती वरुन परतवाडा येथे कामानिमित्त निघाले होते. त्यावेळी भरधाव टेम्पोनं त्यांच्या गाडीला मागून धडक दिली आणि अपघात झाला.(photo: shivthakare9/ig)
7/7
शिव ठाकरे हे मुंबईवरून तीन दिवस सुट्टीच्या काळात अमरावतीला आले होते. शिव यांचे सध्या मुंबईत शुटींग सुरु असून, ते तीन दिवसांसाठी अमरावतीत घरी आले होते. याच सुटीच्या काळात अमरावती ते परतवाडा येथे जात असताना हा अपघात घडला आहे.(photo: shivthakare9/ig)
Published at : 22 Nov 2021 04:45 PM (IST)