In Pics: दादूसने घेतला 'बिग बॉस मराठी'च्या घराचा निरोप; आता उरले फक्त टॉप 8 स्पर्धक; कोण ठरणार विजेता?

Bigg Boss Marathi 3: बिग बॉस मराठीचं घर काही ना काही मुद्द्यावरून चर्चेत असतं, बिग बॉस मराठीच्या चावडीवर काही सदस्यांची महेश मांजरेकरांनी चांगलीच शाळा घेतली. (photo:daduschaudhari_official/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
तसेच जे सदस्य घरामध्ये किंवा टास्कमध्ये दिसत नाहीत त्यांनादेखील ते कुठे कमी पडत आहेत ते सांगितले आहे. या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातून दादूस म्हणजेच संतोष चौधरी बाहेर पडला आहे. (photo:daduschaudhari_official/ig)

आगरी कोळी संगीताने बिग बॉसच्या घरात दादूसने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले होते. बिग बॉस मराठीच्या घरात पहिल्याच आठवड्यात दादूस सेंटर ऑफ अॅट्रॅक्शन बनला होता. (photo:daduschaudhari_official/ig)
महेश मांजरेकरांनीदेखील दादूसच्या खेळीचे कौतुक केले होते. पण या आठवड्यात दादूस डेंजर झोनमध्ये असल्याने त्यांना बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागले.(photo:daduschaudhari_official/ig)
चावडीत विशाल आणि जयने प्रेक्षकांची अतरंगी डिमांडदेखील पूर्ण केली. नॉमिनेशन कार्यात या आठवड्यात घराबाहेर पडण्याच्या प्रक्रियेमध्ये दादूस, मीरा, मीनल, विकास आणि सोनाली नॉमिनेट झाले होते.(photo:daduschaudhari_official/ig)