KRK पासून डॉली बिंद्रापर्यंत, हे स्पर्धक बिग बॉसमध्ये त्यांच्या विचित्र कृत्यांसाठी ओळखले जातात

बिग बॉस 15 मध्ये, अफसाना खान आजकाल चर्चेचा विषय आहे कारण तिला शोमधून बाहेर काढलंय. व्हीआयपी तिकीट न मिळाल्याने अफसानाने चाकूने स्वतःला इजा करण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या वागणुकीचा राग आल्याने बिग बॉसने तिला शोमधून बाहेर काढले. अफसानापूर्वी इतरही अनेक स्पर्धक आहेत जे त्यांच्या विचित्र वागण्यामुळे चर्चेत आले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कमाल रशीद खान: कमाल रशीद खान बिग बॉसच्या घरात पोहोचल्यापासूनच प्रकाशझोतात आला. भांडण करताना त्याने डिझायनर रोहित वर्माला बाटली फेकून मारले, त्यानंतर त्याला शोमधून बाहेर काढण्यात आले.

स्वामी ओम: स्वामी ओम आता या जगात नाहीत पण ते बिग बॉस 10 चा भाग होता. बिग बॉसमध्ये एन्ट्री घेतल्यानंतर स्वामी ओम अनेक स्पर्धकांसोबत शिवीगाळ आणि भांडणामुळे प्रसिद्धीच्या झोतात आले होते, त्यानंतर विचित्र वागणुकीमुळे त्याला शोमधून बाहेर काढले होते
मधुरिमा तुली: मधुरिमाला बिग बॉसने शोमधून बाहेरचा रस्ता दाखवला होता जेव्हा तिने तिचा माजी प्रियकर आणि शोचा स्पर्धक विशाल सिंग याला मारले होते.
डॉली बिंद्रा: डॉली बिग बॉसच्या इतिहासातील सर्वात हिंसक स्पर्धक मानली जाते. अनेकवेळा त्यांचे सहकारी स्पर्धकांसोबत कडाक्याचे भांडण झाले.