Shehnaaz Gill : बिग बॉस 15 च्या ग्रँड फिनालेमध्ये शहनाज गिल सिद्धार्थ शुक्लाला ट्रिब्यूट देणार..

Shehnaaz Bigg Boss Finale Performance : बिग बॉस 15 चा ग्रँड फिनाले (Big Boss Finale 15) लवकरच पार पडणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
करण कुंद्रा (karan Kundrra), तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash), शमिता शेट्टी (Shamita Shetty), निशांत भट (Nishant Bhat), प्रतीक सहजपाल (Pratik Sehajpal) आणि रश्मि देसाई (Rashami Desai) हे या सिझनचे टॉप 6 स्पर्धक आहेत.

या सिझनचा विजेता कोण ठरणार? या गोष्टीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बिग बॉस 15 च्या ग्रँड फिनालेमध्ये अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) ही सिद्धार्थ शुक्लाला (Siddharth Shukla) ट्रिब्यूट देणार आहे.
कलर्स टिव्हीनं त्यांच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवर शहनाजचा व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये शहनाज 'मेरे दिल को पता है' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तसेच शहनाज आणि सिद्धार्थच्या काही आठवणी देखील बिग बॉस 15 च्या ग्रँड फिनालेमध्ये दाखवण्यात येणार आहेत.
अभिनेता सिद्धर्थ शुक्लाचे 2 सप्टेंबर रोजी निधन झाले. सिद्धार्थच्या मृत्यूनं संपूर्ण बॉलिवूडसह त्याच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला होता. सिद्धार्थच्या निधनानंतर काही काळ शहनाज सोशल मीडियापासून दूर राहिली. त्यानंतर ती हौसला रख या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसली. आता शेहनाजचा बिग बॉस 15 च्या ग्रँड फिनालेमधील पर्फोर्मन्स पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. (all photo: shehnazgill/ig)