TDM Movie : 'टीडीएम'ला पाठिंबा देण्यासाठी पुण्यात ट्रॅक्टर मोर्चा; 'मराठीची गळचेपी दूर झालीच पाहिजे' म्हणत शेतकरी बांधवानी केला सपोर्ट
'टीडीएम' या सिनेमाला चित्रपटगृहात शो नसल्या कारणास्तव यावर चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कलाकार मंडळींनी भाष्य करत न्याय मागितला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रेक्षकांनीदेखील 'हा चित्रपट पाहायचा आहे' असे नारे लगावण्यास सुरुवात केली आहे.
'टीडीएम' चित्रपटाच्या समर्थनार्थ काल छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड, शिरूर येथे सर्व शेतकरी बांधवांनी ट्रॅक्टर मोर्चा काढत यांत सहभाग दर्शविला.
'मराठीची गळचेपी दूर झालीच पाहिजे', ''टीडीएम'ला प्राईमटाईम शो मिळालेच पाहिजे','मला 'टीडीएम' पाहायचाय मुंबई - पुण्यात कुठेच नाही' असे नारे लगावत भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढला होता.
खेड्यापाड्यातून स्वमेहनतीने स्वतःच स्थान निर्माण करणाऱ्या या 'टीडीएम' चित्रपटाच्या संपूर्ण टीममागे आज शेतकरी बांधव उभा आहे, ही वाखाणण्याजोगी बाब आहे.
पुणे शहरात टीडीएम चित्रपटाला फक्त २२ थेटर मिळाले होते, तसेच प्राईम टाईम शो न मिळणे हा चित्रपटावर झालेला अन्याय पाहता या चित्रपटाचे चित्रपटगृहातील प्रदर्शन चित्रपटाचे निर्माते भाऊराव कऱ्हाडे यांनी स्वतः रद्द केले होते.
भाऊराव कऱ्हाडे यांच्या 'टीडीएम' या सिनेमाला शो मिळत नसल्याने कलाकारांना अश्रू अनावर झाले होते.
मराठी सिनेमा संपवला जात आहे. आता या पुढे सिनेमा करण्याची माझी इच्छा नाही, अशी खंत या सिनेमाचे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी व्यक्त केली होती.
'टीडीएम' हा सिनेमा 28 एप्रिल 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता.
माझ्या सिनेमाला तुम्हीच न्याय मिळवून द्या, अशी हात जोडत अभिनेत्याने प्रेक्षकांना विनंती केली होती.