Bharti Singh : मुलाच्या जन्मानंतर अवघ्या 12 दिवसांनी भारती सिंह कामावर परतली!

(photo: bharti.laughterqueen/ig)

1/6
Bharti Singh : अभिनेत्री-कॉमेडीयन भारती सिंहने (Bharti Singh) 3 एप्रिल रोजी एका मुलाला जन्म दिला. मुलाच्या जन्मानंतर अवघ्या 12 दिवसांनी भारती सिंह कामावर परतली आहे.(photo: bharti.laughterqueen/ig)
2/6
भारती सिंहने कामावर येताच पापाराझींसमोर आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आणि म्हणाली की, बाळाला घरी सोडताना ती खूप रडली.(photo: bharti.laughterqueen/ig)
3/6
भारती सिंहचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भारती सिंह पापाराझींसोबत बोलताना आणि फोटो पोज देताना दिसत आहे.(photo: bharti.laughterqueen/ig)
4/6
पापाराझींशी संवाद साधताना भारती सिंह म्हणाली की, 'आज सकाळी मी खूप रडले. 12 दिवसांच्या तान्ह्या बाळाला सोडून मी कामावर परतले आहे. पण काम हे काम आहे आणि ते केलेच पाहिजे.’ यानंतर भारती सिंहने पापाराझींना सांगितले की, 'मी आता सर्वांना मिठाई खाऊ घालणार आहे’, असं म्हणत भारती सिंह व्हॅनिटी व्हॅनच्या दिशेने जाऊ लागली.(photo: bharti.laughterqueen/ig)
5/6
भारती सिंहचं आपल्या कामावर इतकं प्रेम आहे की, अगदी बाळाच्या जन्माच्या दिवसापर्यंत ती कामावर होती. यानंतर आता अवघ्या 12 दिवसांनी पुन्हा कामावर परतली आहे. अशा परिस्थितीत भारती सिंहला पुन्हा सेटवर पाहून काही चाहते खूश झाले, तर काही चाहते निर्मात्यांवर नाराज होताना दिसले.(photo: bharti.laughterqueen/ig)
6/6
कोणी भारती परतल्याबद्दल अभिनंदन केले, तर कोणी भारतीबद्दल चिंता व्यक्त करून तिला विश्रांती घेण्याच्या सूचना दिल्या. भारतीचे चाहते या व्हिडीओवर कमेंट करत म्हणाले की, ‘कोणाला इतकं काम करायला लावू नका की, ते त्या पॅशनने काम करू शकणार नाहीत.’ तर कुणी लिहिलं की, ‘मॅडम, तुम्ही इतकी वर्षे सतत काम केले, आता तुमच्या मुलाला थोडा वेळ द्या.. तो फक्त 12 दिवसांचा आहे... अशा परिस्थितीत त्याला त्याच्या आईची गरज भासेल.’(photo: bharti.laughterqueen/ig)
Sponsored Links by Taboola