Bharti Singh : हर्ष लिंबाचियाने शेअर केला मुलासोबतचा खास फॅमिली फोटो!

(photo:haarshlimbachiyaa30/ig)

1/6
टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध जोडी ‘कॉमेडी क्वीन’ भारती सिंह (Bharti Singh) आणि हर्ष लिंबाचिया (Haarsh Limbachiyaa) हे सध्या त्यांच्या लेकासोबत वेळ घालवत आहेत.(photo:haarshlimbachiyaa30/ig)
2/6
काही दिवसांपूर्वी या जोडीने नुकतेच त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत केले आहे. आई-वडील झाल्यापासून भारती-हर्षच्या आयुष्यातील आनंद द्विगुणित झाला आहे.(photo:haarshlimbachiyaa30/ig)
3/6
टीव्ही विश्वातील ही प्रसिद्ध जोडी आपल्या मुलाबाबतचे सर्व अपडेट्स सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच हर्षने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फॅमिली फोटो शेअर केला आहे.(photo:haarshlimbachiyaa30/ig)
4/6
हर्षने शेअर केलेल्या या फोटोत त्यांच्या लेकाची झलक दिसली आहे. कॉमेडियन भारती सिंहचा पती आणि होस्ट हर्ष लिंबाचियाने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा अतिशय क्युट फॅमिली फोटो शेअर केला आहे. (photo:haarshlimbachiyaa30/ig)
5/6
फोटोमध्ये हर्ष आणि भारतीसोबत त्यांचा मुलगा गोला म्हणजेच ‘लक्ष्य’ही दिसत आहे. मात्र, फोटोत मुलाचा चेहरा दिसलेला नाही. भारतीने मुलाला उचलून घेतले आहे, तर भारतीच्या खांद्यावर हात ठेवून हर्ष हसत आहे. या अतिशय सुंदर फोटोच्या कॅप्शनमध्ये हर्षने 'फॅमिली' असे लिहिले आहे.(photo:haarshlimbachiyaa30/ig)
6/6
हर्ष लिंबाचियाचा फॅमिली फोटो पाहून चाहते खूप खुश झाले आहेत. या फोटोला हजारो लाईक्स मिळाले आहेत. चाहतेच नाही तर, मनोरंजन विश्वातील स्टार्सही फोटोवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. करणवीर बोहरा, कोरिओग्राफर धर्मेश, अभिनेत्री युविका चौधरी, नेहा भसीन, आध्विक महाजनी आणि अली गोनी यांनी हर्षच्या पोस्टवर कमेंट केल्या आहेत.(photo:haarshlimbachiyaa30/ig)
Sponsored Links by Taboola