पहिला श्रावणी सोमवार, भाग्यश्री मोटेचा भीमाशंकरला रुद्राभिषेक; फोटो केले शेअर
Bhagyashree Mote : अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिने पुण्यातील भीमाशंकर मंदिरात जात महादेवाला अभिषेक घातलाय.
Bhagyashree Mote
1/7
श्रावण महिन्याचे विशेष महत्त्व लक्षात घेता अनेक भाविक या महिन्यात महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी गर्दी करतात.
2/7
त्याचप्रमाणे अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिनेही श्रद्धेने पहिल्या श्रावणी सोमवाराच्या दिवशी पवित्र अभिषेक विधी पार पाडला.
3/7
तिने दूध, पाणी, बेलपत्र आणि विविध पवित्र सामग्रीसह भगवान शंकरावर रुद्राभिषेक करत स्वतःच्या आणि चाहत्यांच्या जीवनात शांतता व समृद्धी यावी अशी प्रार्थना केली.
4/7
या वेळी मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी दिसून आली. भाग्यश्री मोटे यावेळी पारंपारिक लूकमध्ये पाहायला मिळाली.
5/7
तिने सोशल मीडियावरही या धार्मिक कार्याचे काही फोटो शेअर केले आहेत.
6/7
तिच्या या पोस्टला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला असून, तिच्या भक्तिभावाचे कौतुक होत आहे.
7/7
भाग्यश्री मोटे मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
Published at : 28 Jul 2025 07:52 PM (IST)