2025 मध्ये ‘स्क्विड गेम’ फ्लॉप? IMDb रेटिंगनुसार टॉप K-Drama कोणते आहेत माहितीय? नं -1 कोण?
जगभर गाजलेली ‘Squid Game’ ही मालिका टॉप-5 मध्येही नाही. पाहूया IMDb वर सर्वाधिक रेटिंग मिळवणाऱ्या 2025 मधील टॉप-5 कोरियन ड्रामा कोणते आहेत.
Continues below advertisement
K drama 2025
Continues below advertisement
1/14
2025 संपायला आता अवघे काही दिवस उरले आहेत. या वर्षभरात कोरियन ड्रामांनी (K-Drama) प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं. ‘When Life Gives You Tangerines’ असो किंवा ‘Squid Game’चा अंतिम सीझन सगळीकडे याच मालिकांची चर्चा होती.
2/14
मात्र IMDb रेटिंगनुसार टॉप-5 K-Drama यादी पाहिली तर एक मोठं आश्चर्य समोर येतं.जगभर गाजलेली ‘Squid Game’ ही मालिका टॉप-5 मध्येही नाही.
3/14
रोमँटिक ड्रामा, इंटेन्स थ्रिलर, मेडिकल अॅक्शन आणि फँटसी अशा विविध जॉनरमधील या मालिकांनी 2025 मध्ये प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला आहे. चला तर मग पाहूया IMDb वर सर्वाधिक रेटिंग मिळवणाऱ्या 2025 मधील टॉप-5 कोरियन ड्रामा कोणते आहेत.
4/14
1) When Life Gives You Tangerines IMDb रेटिंग: 9.1 या यादीत अव्वल ठरलीयया ड्रामामध्ये आई आणि मुलगी अशा दोन पिढ्यांची कथा समांतरपणे उलगडण्यात आलीय.
5/14
Oh Ae-sun या भूमिकेत IU (Lee Ji Eun) ने आई आणि मुलगी दोन्ही भूमिका साकारल्या आहेत. Park Bo-gum याचीही दमदार साथ लाभली आहे.
Continues below advertisement
6/14
आईचं बालपण, तिचं आयुष्य, प्रेम, संघर्ष, लग्न, कुटुंब आणि शेवटी येणारा मोठा धक्का ही संपूर्ण कथा अत्यंत हळुवारपणे मांडण्यात आली आहे.
7/14
2) Weak Hero IMDb रेटिंग: 8.4 भारतामध्येही लोकप्रिय ठरलेला ‘Weak Hero’ दुसऱ्या क्रमांकावर आहे. ही कथा शाळेतील विद्यार्थ्यांमधील संघर्ष, बुलींग आणि त्याचे गंभीर परिणाम दाखवते.
8/14
कमजोर समजल्या जाणाऱ्या विद्यार्थ्याला सतत त्रास दिला जातो, पण परिस्थिती बदलल्यावर तोच विद्यार्थी कसा उभा राहतो, हे या मालिकेचं मर्म आहे.
9/14
3)The Trauma Code: Heroes on Call IMDb रेटिंग: 8.4 नावाप्रमाणेच ही मालिका हॉस्पिटलमधील खरे हिरो डॉक्टर्स यांची गोष्ट सांगते. जीनियस सर्जन आणि माजी कॉम्बॅट मेडिक Baek Kang-hyuk ट्रॉमा टीममध्ये नवी ऊर्जा आणतो.
10/14
मेडिकल ड्रामासोबतच यात भरपूर अॅक्शन आणि थरारही आहे. त्यामुळे ही सीरिज वेगळी ठरते.
11/14
4) Study Group IMDb रेटिंग: 8.2 ही कथा शाळेतील क्लासरूमभोवती फिरते. अभ्यासात हुशार पण लुक्समुळे दुर्लक्षित राहणारा एक विद्यार्थी, त्याचा स्टडी ग्रुप आणि त्यांना त्रास देणारे गुंड विद्यार्थी यामधील संघर्ष दाखवण्यात आला आहे.
12/14
अभ्यासासोबतच जोरदार अॅक्शन, मारामारी आणि ट्विस्ट्समुळे ही मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवते.
13/14
5)Way Back Love,IMDb रेटिंग: 8.1 प्रेमावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी ही मालिका खास आहे. शाळेतील दोन विद्यार्थ्यांची प्रेमकहाणी, अपूर्ण राहिलेलं नातं आणि मृत्यूनंतरही उरलेली भावना या सगळ्यांचा भावनिक प्रवास या मालिकेत पाहायला मिळतो.
14/14
हळुवार, वेदनादायी पण मनाला भिडणारी अशी ही कथा आहे.
Published at : 18 Dec 2025 04:10 PM (IST)