Ranbir Kapoor Affairs : दीपिका पदुकोण ते कतरिना कैफ, आलिया भट्ट आधी रणबीरने ‘या’ अभिनेत्रींना केलेय डेट!
Ranbir Kapoor,Alia Bhatt
1/6
बॉलिवूड कपल आलिया भट्ट आणि रणबीर कपूर लग्नबंधनात अडकणार आहेत. आलिया आणि रणबीर 14 एप्रिलला ‘वास्तू’मध्ये सात फेरे घेणार आहेत. रणबीरची आई नीतू कपूर आणि बहीण रिद्धिमा कपूर यांनी लग्नाची तारीख निश्चित केली आहे.
2/6
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. आलियापूर्वी रणबीरने अनेक सुंदरींना डेट केले आहे. आलियापूर्वी त्याने कोणाला डेट केले आहे, ते जाणून घेऊया...
3/6
‘रॉकस्टार’च्या शूटिंगदरम्यान रणबीर कपूरच्या नर्गिस फाखरीसोबतच्या अफेअरच्या बातम्या येऊ लागल्या. पण दोघांनीही त्याला दुजोरा दिला नव्हता. नर्गिसने एका मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा मी इंडस्ट्रीत आले तेव्हा त्याने मला इथे जुळवून घेण्यात खूप मदत केली.
4/6
रणबीर कपूरने त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात दीपिका पदुकोणला डेट केले होते. दोघेही अनेकदा एकत्र दिसले होते. रणबीर आणि दीपिकाची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री आजपर्यंत सर्वोत्कृष्ट ठरली आहे. ब्रेकअपनंतर दोघे चांगले मित्र बनले असून, अनेकदा ते एकत्र पार्टी करताना दिसतात.
5/6
कॉलेजच्या दिवसांमध्ये रणबीर कपूरने अवंतिका मलिकला डेट केले होते. रणबीरचं अवंतिकावर क्रश होतं. पण अवंतिकाला इम्रान खान आवडला. 2011 मध्ये दोघांचे लग्न झाले. पण आता दोघेही वेगळे झाले आहेत.
6/6
रणबीर कपूर आणि कतरिना कैफची लव्हस्टोरी कोणाला माहित नाही. त्यांच्या अफेअरबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे. रणबीर आणि आलिया जवळपास 6 वर्षे डेट करत होते. कतरिना आणि रणबीरच्या ब्रेकअपची बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला होता. त्यांचे व्हेकेशनचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.
Published at : 14 Apr 2022 07:24 AM (IST)