Barbie Doll : 62 वर्षापूर्वी झालेली बार्बी डॉलच्या विक्रीस सुरूवात
लहान मुलींच्या बाहुला-बाहुलीच्या या विश्वात सर्वाधिक प्रसिध्द असलेली बाहुली म्हणजे, बार्बी डॉल.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबार्बी आज जगातील अनेक मुलींची सखी झाली आहे. जगप्रसिद्ध असलेली बाहुली सर्वप्रथम 9 मार्च 1959 मध्ये मॅटेल या कंपनीद्वारे बाजारात आली.
अमेरिकेच्या डेन्वर, कोलेरॅडो मध्ये 19916 साली जन्मलेल्या रुथ हँडलर यांनी केवळ घर सांभाळत न पतीच्या साहाय्याने व्यवसायाला सुरूवात केली. मॅटल कॉर्पोरेशन नावाने सुरू केलेल्या या कंपनीच्या माध्यमातून त्या विविध खेळ साहित्याचं उत्पादन करत असत.
1956 साली हँडलर कुटुंबिय आपली दोन मुलं, बार्बरा आणि केनेथ यांच्यासह युरोपला फिरायला गेले. त्यावेळी जर्मनीमध्ये प्रसिध्द असलेली लीली डॉल रुथ यांनी विकत घेतली.
छोट्या बार्बराला ही लीली भलतीच भावली. त्यावेळी अमेरिकेमध्ये केवळ लाकूड किंवा कागदापासून बनवलेल्या बाहुल्यांचीच निर्मिती होत असे.
लीलीचं नाजूक रुप पाहून रुथला अमेरिकेमध्ये असं उत्पादन व्हावं, असं वाटू लागलं. पण ती केवळ बाहुली न राहता लहान मुलींबरोबरच किशोरवयीन मुलींना तो एक आदर्श वाटावा, अशी रुथ हँडलर यांची संकल्पना होती.
मॅटल कंपनीमध्ये त्यांनी जेव्हा हा विचार मांडला तेव्हा, तिच्या पतीसह कोणालाच ही संकल्पना आवडली नाही.
अमेरिकेत अशाप्रकारची संकल्पना मूळ धरुच शकणार नाही, असं रुथ यांना कंपनीच्या बैठकीत सांगण्यात आलं.
युरोपहून परतल्यानंतर आपल्या मुलीला लागलेल्या लीली बाहुलीच्या वेडावरुन रुथ यांना खात्री होती की अमेरिकेत अशाप्रकारची बाहुली नक्कीच लोकप्रिय होईल.
लीलीमध्ये त्यांना अपेक्षित असलेले बदल केले. 9 मे 1959 साली अमेरिकन इंटरनॅशनल टॉय फेअरमध्ये ही बाहुली प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली