PHOTO: चला तर पाहूया घरगुती गणपती स्पर्धा 2022चे आजचे विजेते!

'एबीपी माझा' परिवाराकडून तुम्हाला, तुमच्या परिवार आणि मित्रमंडळींना गणेशोत्सवाच्या मंगलमयी शुभेच्छा.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
काय मग? घरात गणपती बाप्पाचं आगमन झाल्यावर आता लगबग वाढली असेल ना? कुणाचा दीड दिवस, कुणाचे गौरी गणपती तर कुणाचे बाप्पा अनंत चतुर्दशीपर्यंत मुक्काम करणार असतील.

आता साक्षात बाप्पांचं घरी आगमन होणार म्हटल्यावर सजावट देखणी आणि लाखात एक झालीच पाहिजे, नाही का? त्यात गौराई घरी येणार असतील तर त्याचं कौड-कौतुक जरा जास्तच करणार ना आपण? अहो, मग इतक्या प्रेमानं, कष्टानं घडवलेल्या सजावटीचं कौतुक फक्त पाहुण्यांकडूनच कशाला, अख्ख्या महाराष्ट्रातूनच होऊ द्या की!
अश्याच काही भाविकांनी त्यांच्या लाडक्या घरगुती बाप्पांचे फोटो एबीपी माझाला पाठवले आहेत. चला तर विजेते पाहूया..
पुण्याच्या निखिल भालचंद्र कुलकर्णी यांनी यंदा 75व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त खास देखावा सादर केलाय.
पालघरवच्या सागर पाटील यांचा फेटा घातलेला बाप्पा सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे.
इको फ्रेंडली ताडपत्रीने सादर केलेला हा देखावा पर्यावरणप्रेमींसाठी आदर्श ठरत आहे.
तुम्हीही आपल्या घरी विराजमान झालेल्या बाप्पाचे फोटो नाव,पत्त्यासह आम्हाला #बाप्पामाझा या हॅशटॅग सोबत टॅग करा...
स्पर्धेद्वारे येणारे आणि निवडलेले फोटो आणि व्हिडीओ 'एबीपी माझा'च्या सोशल मीडिया आणि टी.व्ही.वर दाखवले जातील.
तेव्हा म्हणा, गणपती बाप्पा मोरया......एबीपी माझाच्या स्पर्धेत भाग घेऊया!!!!!