प्रीती झिंटापासून ते अनुष्का शर्मापर्यंत, 2021मध्ये आई बाबा बनलेत बी-टाऊनचे हे 5 स्टार्स
Preity Zinta:सुपर स्टार अभिनेत्री प्रीती झिंटा आणि तिचे पती जीन गुडइनफ यांनी सरोगसीद्वारे जुळ्या मुलांचे जय आणि जिया यांचं आपल्या आयुष्यात स्वागत केले आहे. प्रीतीने तिच्या इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांना ही खुशखबर दिली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppKareena Kapoor Khan: मुलगा तैमूर अली खाननंतर, करीना आणि सैफ अली खान या वर्षी आणखी एका मुलाचे पालक झाले, ज्याचे नाव त्यांनी जहांगीर ठेवले. जहांगीरच्या नावावरून सोशल मीडियावर बराच वाद झाला होता.
Anushka Sharma : या वर्षाच्या सुरुवातीला अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या घरीदेखील गोंडस बाळाचा जन्म झाला. विरुष्कानं आपल्या चिमुकलीचं नाव वामिका ठेवलंय
Neha Dhupia: या यादीत नेहा धुपियाच्या नावाचाही समावेश आहे. मुलीनंतर नेहाने यावर्षी एका मुलाचे स्वागत केले. नेहाने तिच्या सोशल मीडियावरून ही माहिती दिली.
Shilpa Shetty: शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा देखील सरोगसीच्या माध्यमातून यावर्षी एका मुलीचे पालक झाले आहेत. यापूर्वी शिल्पाने मुलगा विआनला जन्म दिला होता.