किल ते फिर आयी हसीन दिलरुबा, ऑगस्ट महिन्यात मनोरंजनाची चंगळ, बडे चित्रपट, वेब मालिका होणार रिलिज!

ऑगस्ट महिन्यात ओटीटीवर मनोरंजनाचा धमाका होणार आहे. या महिन्यात तुम्हाला क्राइम, थ्रिलर, कॉमेडीने ओतप्रोत असलेल्या चित्रपट, वेब मालिकांचा आनंद घेता येणार आहे.

ऑगस्ट महिन्यात लाँग वीकेंड आहे. ओटीटीवर धमाकेदार चित्रपट, वेब सीरिज रिलीज होणार आहेत.

1/5
'फिर आयी हसीन दिलरुबा' हा चित्रपट ऑगस्टच्या सुरुवातीला प्रदर्शित होणार आहे. 2021 मध्ये रिलीज झालेल्या 'हसीन दिलरुबा' या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. या चित्रपटात विक्रांत मेस्सी, तापसी पन्नू आणि कौशल यांची भूमिका बघायला मिळणार आहे.
2/5
अभिनेता संजय दत्त आणि अभिनेत्री रवीना टंडन यांची भूमिका असलेल्या 'घोडचडी' या चित्रपटाचा प्रीमियर 9 ऑगस्ट रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ सिनेमावर होणार आहे. रवीना आणि संजय व्यतिरिक्त, या रोमँटिक कॉमेडी चित्रपटात खुशाली कुमार, पार्थ समथान आणि अरुणा इराणी यांची भूमिका आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
3/5
लक्ष्य, राघव जुयाल आणि तान्या माणिकतला यांचा 'किल' हा चित्रपट ऑगस्टच्या मध्यात Disney+ Hotstar वर रिलीज होणार आहे. आतापर्यंत 'किल'ने बॉक्स ऑफिसवर 21.15 कोटींची कमाई केली आहे.
4/5
15 ऑगस्ट रोजी 'मनोरथंगल' अँथॉलॉजी मालिका Zee5 वर रिलीज होणार आहे. यात 9 कथा आहेत, ज्यांचे दिग्दर्शन 8 चित्रपत निर्मात्यांनी केली आहे. विशेष म्हणजे या वेब सीरिजमध्ये कमल हासन, मामूट्टी, मोहनलाल आणि फहद फॉसिलसह अनेक मोठे सुपरस्टार आहेत.
5/5
'ग्यारह ग्यारह' या नव्या वेब सीरिजमध्ये राघव, कृतिका कामरा आणि धैर्य करवा यांची भूमिका आहे. ही वेब सीरिज 9 ऑगस्ट 2024 रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म Zee5 वर रिलीज होईल. राघव जुयास याने 'किल'च्या निर्मात्यांसोबत 'ग्यारह ग्यारह' ही नवी वेब सीरिज तयार केली आहे.
Sponsored Links by Taboola