मोठी बातमी : उदयनराजे भोसले बोलतोय! असं म्हणत अभिनेता आमिर खानची फसवणूक करण्याचा प्रयत्न
Actor Aamir Khan : खासदार उदयनराजे भोसले बोलतोय! असं म्हणत अभिनेता आमिर खानची फसवणूक करण्याचा प्रयत्न, नेमकं काय घडलं?
Actor Aamir Khan
1/8
खासदार उदयनराजे भोसले यांच्या नावाचा दुरुपयोग करून एका भामट्याने जानेवारी महिन्यापासून बॉलिवूड अभिनेता आमिर खानला संपर्क करण्यास सुरुवात केली.
2/8
मी स्वतः उदयनराजे बोलतोय असे भासवत "माझे काही लोक आपल्याला भेटायला येतील त्यांना मदत करा" असे फोन कॉल या आरोपीने आमिर खानला केले होते
3/8
पुण्यातील अली अमानत शेख असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे.
4/8
या सर्व प्रकाराची माहिती आमिर खान यांच्या टीमने उदयनराजे भोसले यांचे निकटवर्तीय पंकज चव्हाण यांना दिली.
5/8
त्यानंतर पंकज चव्हाण यांनी स्वतः संशयित आरोपीला फोन करून या प्रकार समजून घेतला.
6/8
संबंधित आरोपी उदयनराजे भोसले बोलतोय अशी माहिती देत असल्याचे समोर आले..
7/8
याप्रकरणी अली अमानत शेख याच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
8/8
या प्रकरणाचा सखोल तपास शाहूपुरी पोलीस करत आहेत.
Published at : 17 Jul 2025 08:18 PM (IST)