लोकप्रिय बॉलिवूड दिग्दर्शक होणार दुसऱ्यांदा बाबा; घरात लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन

शाहरुख खान अभिनीत जवान या हिंदी चित्रपटामुळे त्यांनी अखिल भारतीय पातळीवर मोठी लोकप्रियता मिळवली.

Continues below advertisement

Atlee priya

Continues below advertisement
1/8
दाक्षिणात्य आणि हिंदी सिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणारा दिग्दर्शक अ‍ॅटली आणि त्याची पत्नी, निर्माती प्रिया अ‍ॅटली यांनी चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे.
2/8
हे सेलिब्रिटी कपल दुसऱ्यांदा आई-वडील होणार असून, त्यांच्या घरात लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. या गोड बातमीमुळे चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
3/8
अ‍ॅटली आणि प्रियाने ही माहिती सोशल मीडियावर भावनिक पोस्टद्वारे जाहीर केली. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं आहे, “आमचं घर आता आणखी आनंदी होणार आहे. आमच्या कुटुंबात लवकरच नव्या सदस्याची भर पडणार आहे.
4/8
होय, आम्ही पुन्हा एकदा पालक होणार आहोत. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा, प्रेम आणि आशीर्वाद हवेत.” या पोस्टमध्ये त्यांच्या आनंदाची झलक स्पष्टपणे दिसून येते.
5/8
अ‍ॅटली, प्रिया, त्यांचा मुलगा मीर आणि त्यांचे लाडके पाळीव कुत्रे बेकी, युकी, चॉकी, कॉफी आणि गूफी सगळ्यांच्याच नावांचा या पोस्टमध्ये उल्लेख आहे. त्यामुळे त्यांच्या कौटुंबिक आयुष्याचा एक प्रेमळ आणि खास क्षण चाहत्यांसमोर आला आहे.
Continues below advertisement
6/8
अ‍ॅटली आणि प्रियाचा मुलगा मीर आधीच त्यांच्या आयुष्यात आनंद आणतोय आणि आता दुसऱ्या बाळाच्या आगमनाची तयारी संपूर्ण कुटुंबात सुरू आहे.
7/8
दरम्यान, कामाच्या आघाडीवरही अ‍ॅटली सध्या चर्चेत आहेत. थेरी, मर्सल, बिगिल यांसारख्या सुपरहिट तमिळ चित्रपटांसह शाहरुख खान अभिनीत 'जवान' या हिंदी चित्रपटामुळे त्यानी अखिल भारतीय पातळीवर मोठी लोकप्रियता मिळवली.
8/8
अ‍ॅटली याचा आगामी पॅन-इंडिया प्रोजेक्ट सध्या प्री-प्रोडक्शन टप्प्यात असून, या चित्रपटात सुपरस्टार अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
Sponsored Links by Taboola