राज ठाकरे, आमीर खान ते जेनिलिया-रितेश, आशुतोष गोवारीकर यांच्या मुलाच्या लग्नात दिग्गजांची हजेरी; ग्रँड विवाहाचे ग्रँड फोटो!
Ashutosh Gowariker Son Wedding : आशुतोष गोवारीकर यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यास बॉलिवुड तसेच राजकीय क्षेत्रातील दिग्गज चेहरे उपस्थित होते.
ashutosh gowariker song wedding
1/14
चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या मुलाचे नुकतेच लग्न झाले. या लग्नसोहळ्यात बॉलिवुडचे दिग्गज चेहरे उपस्थित राहिले होते.
2/14
आशुतोष गोवारीकर यांच्या मुलाचे नाव कोणार्क गोवारीकर असे आहे. त्याचे 2 मार्च 2025 रोजी त्याचे नियती कनाकिया यांच्याशी लग्न झाले आहे.
3/14
अत्यंत थाटामाटात हा विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यासाठी प्री-वेडिंग सेरेमनी आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर 28 फेब्रुवारी रोजी हळदी समारंभही मोठ्या उत्साहात पार पडला.
4/14
बॉलिवुड जगतात प्रसिद्ध असलेली रितेश देशमुख आणि जेनिलिया डिसुझा ही जोडीदेखील आशुतोष गोवारीकर यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यास उपस्थित होती.
5/14
या विवाह सोहळ्यास प्रसिद्ध अभिनेता आमीर खान हादेखील हजर झाला होता. काळ्या रंगाच्या सुटमध्ये आमीर खान या विवाहास उपस्थित राहिला होता.
6/14
प्रसिद्ध गायक, संगीतकार अनू मलिक सहपरिवार आशुतोष गोवारीकर यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यास उपस्थित होते.
7/14
अभिनेता, दिग्दर्शक फरहान अख्तर हादेखील कोणार्क गोवारीकर यांच्या विवाह सोहळ्यास उपस्थित होता.
8/14
विद्या बालन हीदेखील त्याच्या पतीसोबत या विवाह सोहळ्यास उपस्थित राहिली होती.
9/14
विद्या बालन या विवाहाला महाराष्ट्रीय साडी परिधान करून आली होती.
10/14
प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनीही पत्नी शबाना आझमी यांच्यासोबत या विवाहाला हजेरी लावली.
11/14
मिसमॅच्ड या वेब सिरीजच्या माध्यमातून संपूर्ण देशात प्रसिद्ध झालेली विद्या माळवदे हीदेखील या विवाहाला उपस्थित होती.
12/14
माजी मंत्री नवाब मलिका यांनीही आशुतोष गोवारीकर यांच्या मुलाच्या विवाहाला उपस्थिती दर्शवली.
13/14
बॉलिवुडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्र ही आपल्या पतीसोबत या विवाह सोहळ्यास उपस्थित होती.
14/14
थ्री इडियट्स, मुन्नाभाई एमबीबीएस, संजू यासारख्या प्रसिद्ध चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनीही या विवाह सोहळ्यास उपस्थिती लावली होती.
Published at : 03 Mar 2025 03:08 PM (IST)