Asha Bhosle Funeral Updates Rashmi Thackeray: आशाताईंच्या आवाजातील 'जिवलगा कधी रे येशील तू...' गाण्याचे आर्त सूर; आशा भोसलेंचं पार्थिव पाहताच रश्मी ठाकरे ढसाढसा रडल्या...
Asha Bhosle Funeral Updates Rashmi Thackeray: सूरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या निधनानं संपूर्ण देश शोकसागरात बुडालाय. आशा भोसले यांच्या जाण्यानं इंडस्ट्रीत मोठी पोकळी निर्माण झालीय.

Asha Bhosle Funeral Updates Rashmi Thackeray
1/11
सूरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या निधनानं संपूर्ण देश शोकसागरात बुडालाय. आशा भोसले यांच्या जाण्यानं इंडस्ट्रीत मोठी पोकळी निर्माण झालीय.
2/11
आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी शिवाजी पार्क इथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यापूर्वी त्यांचं पार्थिव लोअर परेल येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं.
3/11
यावेळी आशा भोसले यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी दिग्गजांची रिघ पाहायला मिळतेय.
4/11
आशा भोसले यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आणि त्यांच्या अंत्यदर्शनासाठी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उबाठागटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक उपस्थित राहिले. तसेच, त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र आणि आमदार आदित्य ठाकरेही उपस्थित होते.
5/11
सूरसम्राज्ञी आशा भोसले यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी भेट दिली.
6/11
आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचलेल्या रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.
7/11
आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे उपस्थित होत्या. त्यावेळी रश्मी ठाकरे आशा भोसलेंच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचल्या आणि हमसून हमसून रडू लागल्या.
8/11
आशा भोसले यांच्या कुटुंबीयांचं सांत्वन करतानाही रश्मी ठाकरे यांना रडू कोसळलं. त्यावेळी त्यांनी आशा ठाकरेंची नात जनाई भोसलेला घट्ट मिठीही मारली.
9/11
तर, उद्धव ठाकरेही आशा भोसले यांचं अंत्यदर्शन घेतल्यानंतर भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.
10/11
एकंदरीतच मंगेशकर कुटुंबीय आणि ठाकरे घराण्याचे अत्यंत जवळचे संबंध होते. आशा भोसले यांनी अनेकदा मुलाखतीत बोलताना बाळासाहेब ठाकरे, तसेच, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केला आहे.
11/11
आज संध्याकाळी 4 वाजता आशा भोसले यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Published at : 13 Apr 2026 12:42 PM (IST)